• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs IRE : आपण आयर्लंडकडून हरलो, एकच खेळाडू ठरला टीम इंडियाच्या पराभवासाठी सर्वात मोठा खलनायक

June 26, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध कृष्णाकडे चांगली हाईट आहे, चांगला वेग आहे. पण गोलंदाजीत दिशा आणि टप्पा नाहीय. त्याचा फटका आज भारताला पहिल्या T20 सामन्यात बसला. आयर्लंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारताचा 34 धावांनी पराभव झाला. आयर्लंडने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 9 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 148 धावांवर आटोपला. आयर्लंड सारख्या दुबळ्या संघाकडून टीम इंडियाचा पराभव झाला,त्याला अनेक कारणं आहेत. पण एक मुख्य कारण म्हणजे प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी. त्याच्या 4 ओव्हरमध्ये आयरिश फलंदाजांनी 57 धावा लुटल्या. त्याच्या गोलंदाजीचा इकॉनमी रेट 14.2 प्रति ओव्हर होता. प्रसिद्ध कृष्णाने खूप खराब गोलंदाजी केली. त्याच्या बॉलिंगवर आयरिश फलंदाजांनी 5 सिक्स आणि चार फोर वसूल केल्या. त्यात तीन सिक्स तर त्याला सलग तीन चेंडूंवर पडल्या.

प्रसिद्ध कृष्णा पहिल्याच ओव्हरपासून खूप खराब गोलंदाजी करत होता. 7 व्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरने त्याला गोलंदाजीसाठी आणलं. बेंजमिन कॅल्टजने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये दोन सिक्स मारल्या. 9 व्या आणि 11 व्या ओव्हरमध्ये त्याने थोडीफार चांगली गोलंदाजी केली. या दोन ओव्हरमध्ये त्याने दोन चौकार दिले. पण प्रसिद्ध कृष्णाची खरी धुलाई लास्ट ओव्हरमध्ये झाली. त्यात त्याने 27 रन्स दिले.

सर्वाधिक धावा देणारा तो गोलंदाज बनला

प्रसिद्ध कृष्णा 17 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीला आला, तेव्हा त्याने पहिल्या तीन चेंडूत दोन चौकार दिले. गॅरेथ डेलानीने तर त्याच्या शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार मारले. डेलानीच्या या तुफान फलंदाजीच्या बळावर आयर्लंडने 180 धावांचा टप्पा ओलांडला. कृष्णाने 4 ओव्हरमध्ये 57 धावा दिल्या. आयर्लंड मध्ये एका T20 सामन्यात सर्वाधिक धावा देणारा तो गोलंदाज बनला आहे.

टी20 मध्ये खूप खराब रेकॉर्ड

प्रसिद्ध कृष्णाचा टी20 मध्ये खूप खराब रेकॉर्ड आहे. त्याने 6 टी 20 सामन्यात फक्त 8 विकेट घेतले आहेत. त्याने 24 ओव्हरमध्ये 277 धावा दिल्या आहेत. म्हणजे कृष्णाचा इकॉनमी रेट 11.54 प्रति ओव्हर आहे. इतका खराब रेकॉर्ड असूनही त्याला टीम इंडियात संधी मिळते. त्याला पाठिंबा दिला जातो.

Run-machine Prasidh Krishna conceded 57 runs in his 4 overs against Ireland 😭

– He’s a genuine wicket-taker, but he leaks too many runs.
– A very good bowler in red-ball cricket.
– But in white-ball cricket—especially T20Is—he isn’t the ideal choice. 😭

What’s your take? pic.twitter.com/7HiC33nnb2

— Jara (@JARA_Memer) June 26, 2026

इतर भारतीय गोलंदाजांची कामगिरी कशी?

बेलफास्टमध्ये आयर्लंडच्या टीमने कमाल फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 182 धावा फटकावल्या. आयर्लंडसाठी कॅप्टन लॉर्कन टकरने 36 चेंडूत 50 धावांची खेळी केली. डेलानीने 49 धावांचं योगदान दिलं. प्रसिद्ध कृष्णाऐवजी इतर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. हर्षित राणाने 24 धावा देऊन 3 विकेट काढल्या. अर्शदीप आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट काढले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांची गर्दी, व्हिडिओ समोर आल्याने खळबळ
  • फॉर्च्युनर अन् स्कॉर्पिओचा जमाना गेला! आता राजकारण्यांची पहिली पसंती ठरतायत ‘इलेक्ट्रिक गाड्या’
  • केतनसोबतच्या लग्नाबाबत सियाच्या भावाचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाला; ‘जर सियाने…’
  • Ketan Agarwal: त्या दिवशी तिने ठरवले त्याला संपवायचे… सिया गोयलचा खतरनाक प्लॅन… अन् 18 दिवसांनी तिने गेम केलाच, तो खळबळजनक खुलासा
  • सियाच्या भावाची 10 तास कसून चौकशी, तो प्रश्न विचारताच गप्प, लगेच निघाला, अडचणी वाढणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in