
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांची निर्घृण हत्या झाल्यानंतर संतापलेल्या भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवले होते. भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही मोहिम राबिवली होती. या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैनिकांनी अचाट पराक्रम करीत पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. या ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीर झालेल्या सहा वीर जवानांची नावे भारताने प्रथमच जाहीर केली आहेत. या बहादूर सैनिकांच्या पराक्रमाला राष्ट्रीय युद्ध स्मारकावर स्थान मिळणार आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानच्या आत जाऊन खोलवर लढाऊ विमानांनी मारा केला होता.७ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ तळांना संपूर्ण नष्ट करण्यात आले होते. भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करीत त्यांना संपूर्णपणे उद्धवस्त केले होते. या ८८ तासांच्या ऑपरेशनमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञान (उदा. ब्रह्मोस क्षेपणास्त्र) वापरून पाकिस्तानची शस्त्रे निष्प्रभ केली होती.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शहीद झालेल्या शुर वीरांची नावे आज भारताने जाहीर केली आहेत. यात १ ) सुभेदार मेजर पवन कुमार,२) रायफल मॅन सुनील कुमार, ३)लान्स नायक दिनेश कुमार,४) अग्निवीर मूड मुरली नाईक, ५) हवालदार सुनील कुमार सिंह, ६) सार्जंट सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply