• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंतिम सुनावणीच्या वेळीच नेहमी..; पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या पतीची पोस्ट चर्चेत, 5 वर्षांपासून हेच सुरू..

June 30, 2026 by admin Leave a Comment


Shilpa Shetty Husband Raj Kundra : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा गेल्या अनेक वर्षांपासून पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज याला अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला. 5 वर्ष जुन्या केसमध्ये राज याला तुरुंगवास देखील भोगावा लागलेला. पण अद्यापही या प्रकरणी राज याला न्याय मिळालेला नाही. आजही अभिनेत्री पती न्यायासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी निकाल अंतिम टप्प्यावर येतो, पण मध्येचं असं काही होतं, ज्यामुळे राज याला पुन्हा नव्याने प्रक्रिया सुरु करावी लागते. यावर आता राज कुंद्रा याने खंत व्यक्त केली आहे. एक्सवर एक पोस्ट करत राज याने नेमकी काय परिस्थिती आहे. याबद्दल सांगितलं आहे. सध्या राज याची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

एक्सवर एक पोस्ट शेअर करत राज कुंद्रा म्हणाला, ‘तब्बल 5 वर्ष झाली आहे. पण आजही मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. जेव्हा माझ्या प्रकरणात अंतिम सुनावणी किंवा सुरक्षित आदेशाची स्थिती येते, तेव्हा – तेव्हा प्रत्येक वेळी न्यायाधीशांची बदली किंवा पदोन्नती होते. ज्यामुळए संपूर्ण खटला नवीन न्यायाधीशांसमोर पुन्हा नव्याने सुरू करावा लागतो.’

 

Five years. Still waiting for justice.

Every time my case reaches the stage of a final hearing or a reserved order, the judge is transferred or promoted, and the matter starts all over again before a new Judge.

The process resets. The costs keep rising. Time keeps passing.

If…

— Raj Kundra (@onlyrajkundra) June 28, 2026

 

‘प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु होते, अशात खर्च वाढतो आणि मुख्य म्हणजे वेळ जातो…’, राज कुंद्रा याने अशा सामान्य नागरिकांबद्दलही सहानुभूती व्यक्त केली, जे मर्यादित संसाधने असूनही न्यायासाठी वर्षानुवर्षे लढा देत असतात. ‘ही प्रक्रिया माझ्यासाठी इतकी त्रासदायक आहे तर, विचार करा अन्य सामान्य लोकांची काय अवस्था असेल. त्यांच्याकडे लढण्यासाठी पर्याप्त संसाधन देखील नाही… ही फक्त एक कायद्याची समस्या नाही तर, एक मानवीय समस्या देखील आहे. ‘

63 दिवस तुरुंगात होता राज कुंद्रा

सांगायचं झालं तर, 2021 मध्ये राज कुंद्रा याच्यावर मोबाईल ॲप्लिकेशन्सद्वारे अश्लील सामग्री प्रसारित केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी राज याला अटक करण्यात आली होती आणि 63 दिवस आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आपल्यावरील हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचं राज याने कायम म्हटले आहे. सध्या राज याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नुसतं भांडायची, सतत फोन बिजी, केतन अग्रवालला आली होती शंका, वडिलांना सांगितलं पण…नव्या माहितीने खळबळ!
  • …तर मुद्रांक शुक्ल परतावा बंद, सरकारने उचललं मोठं पाऊल; तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार?
  • एक रिकामा कप अन् गाणं ब्लॉकबस्टर; किशोर कुमार यांची गजब ट्रिक, आजही मनाला स्पर्श करून जातं गीत
  • केतन याला आधीच आला होता सियाचा संशय,पण वडीलांनी सांगितले की…
  • FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील मागच्या पाच विजेत्या संघाची अशी कहाणी, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in