• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंड्याच्या किंमतीत 40 टक्क्यांनी वाढ, या कारणामुळे वाढल्या किंमती..

August 29, 2026 by admin Leave a Comment


इंधनात इथेनॉल मिक्स करण्याच्या धोरणावरुन साखर महाग झाल्याचा आरोप होत असतानाच आता इथेनॉलमुळे
अंडी सुद्धा महाग झाले आहेत… ज्यामुळे एका वर्षात अंड्याची किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढलीय. पोल्ट्री फॉर्ममध्ये
कोंबड्यांना खाद्य म्हणून मुख्यत्वे मक्याचा सर्वाधिक वापर होतो. तोच मका इथेनॉल निर्मितीसाठीही मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. परिणामी कोंबड्याचं खाद्य महागल्यानं अंड्याचे दरही वाढलेयत. 6-7 रुपयांना मिळणारी अंडी आता 9 ते 10 रुपयांपर्यंत गेले आहेत. नॅशनल एग कॉर्डिनेशननुसार एकूण उत्पादनाच्या 37 टक्के मका इथेनॉलच्या निर्मितीसाठी वापरला जातोय. भारतात 43. 4 मिलियन टन मक्याचं उत्पादन होतं. यापैकी 17 मिलियन टन मका इथेनॉल निर्मितीसाठी जातोय. 3 वर्षापूर्वी मक्याची किंमत प्रतिटन 14 हजार रुपये होती.

तीच किंमत आता प्रतिटन 26 हजार 500 वर गेलीय. गेल्या 5 महिन्यात मक्याची किंमत 20 टक्क्यांनी वाढली
कोंबड्यांचं हेच मुख्य खाद्य महागल्यानं अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या एका अंड्यासाठी ग्राहकांना साधारणपणे 8 ते 9 रुपये मोजावे लागतायत.

भारत पेट्रोल-डिझेलसाठी प्रमुखपणे अरब देशांवर अवलंबून आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी भारत सरकारनं इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं. त्यासाठी पेट्रोलमध्ये आता 20 टक्के इथेनॉल मिसळवण्यात येतंय. ऊस आणि मक्यापासूनच मोठ्या प्रमाणात इथेनॉल बनवलं जातं. मात्र सद्यस्थितीत त्याच इथेनॉलमुळे साखर आणि पाठोपाठ अंडीही महागल्याचं
बोललं जातंय. इथेनॉलला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. वाहनचालक याला विरोध करत आहेत.

काहींचे म्हणणे आहे की, इथेनॉलच्या वापरामुळे गाड्या खराब होत आहेत. मात्र, सरकार इथेनॉलच्या वापरासाठी आग्रही आहे. अरविंद केजरीवालही इथेनॉलला विरोध करताना दिसत आहेत. त्यांनी जोरदार विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चाही काढण्यात आला. अरब देशांकडून इथेनॉल खरेदी केल्यावर मोठ्या प्रमाणात पैसा जातो. तो पैसा वाचवण्यासाठी इथेनॉल हा पर्याय आणला आहे. मात्र, वाहनांच्या इंजिनवर याचा वाईट परिणाम होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in