• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप, त्या युक्तीवादाने प्रकरणाला मोठी कलाटणी?

August 30, 2026 by admin Leave a Comment


उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया येथील घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार आढळलेली होती. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याप्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन हत्याकांडात आता एक नवा वाद समोर आला आहे. या प्रकरणातील १५२ वे साक्षीदार आणि सायबर तज्ज्ञ ईशांत सिन्हा यांनी NIA समोर दिलेल्या जबाबाचा दाखला देत तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सायबर तज्ज्ञावर दबाव टाकून खोटा तांत्रिक अहवाल तयार करून घेतला आणि त्यासाठी ५ लाख रुपये देण्यात आल्याचा दावा साक्ष मध्ये असल्याचा दावा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बी. आर. घाडगे यांनी केला आहे. या साक्षीच्या आधारे परमबीर सिंग यांना अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी NIA विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर १ सप्टेंबर रोजी महत्त्वाचा युक्तिवाद होणार आहे.

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांतच या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील खाडीत सापडला. या दोन्ही प्रकरणांचा तपास NIAकडे सोपवण्यात आला असून, सध्या या बहुचर्चित प्रकरणाचा खटला NIA विशेष न्यायालयात सुरू आहे.दरम्यान, कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बी. आर. घाडगे आणि त्यांचे वकील अॅड. भूषण बेंद्रे यांनी या प्रकरणासंदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खटल्यातील १५२ वे साक्षीदार आणि सायबर तज्ज्ञ ईशांत सिन्हा यांनी NIA समोर दिलेल्या जबाबात काही गंभीर दावे केले आहेत.

अँटिलिया प्रकरणानंतर ‘जैश-उल-हिंद’ या नावाने टेलिग्राम चॅनेलवरून या कटाची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. या संदर्भातील डिजिटल पुरावे आणि तांत्रिक अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेत दबाव आणण्यात आल्याचा दावा ईशांत सिन्हा यांनी आपल्या साक्षीत केल्याचे घाडगे यांनी सांगितले.ईशांत सिन्हा यांच्या जबाबाचा हवाला देत, तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मूळ तांत्रिक अहवालात बदल करून त्यामध्ये अतिरिक्त माहिती आणि पोस्टर समाविष्ट करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हा कथित अहवाल तयार करण्यासाठी परमबीर सिंग यांच्या वैयक्तिक सहाय्यकामार्फत (PA) एकूण ५ लाख रुपये देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला असल्याचे घाडगे यांनी सांगितले.

परमबीर सिंग यांना सहआरोपी करण्याची विनंती

यासंदर्भातील उल्लेख न्यायालयीन कागदपत्रांमध्येही असल्याचे त्यांनी नमूद केले. या साक्षीच्या आधारे परमबीर सिंग यांची चौकशी का करण्यात आली नाही? त्यांचा जबाब का नोंदवण्यात आला नाही? तसेच कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी का झाली नाही? असे अनेक प्रश्न घाडगे यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.सायबर तज्ज्ञ ईशांत सिन्हा यांच्या साक्षीची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्यानंतर निवृत्त एसीपी बी. आर. घाडगे यांनी NIA विशेष न्यायालयात थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन याचिका दाखल केली आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडामागील संपूर्ण कटाचा सूत्रधार कोण होता, याचा शोध घेण्यासाठी परमबीर सिंग यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, या याचिकेवर १ सप्टेंबर रोजी NIA विशेष न्यायालयात महत्त्वाचा युक्तिवाद होणार आहे. ईशांत सिन्हा यांच्या साक्षीतील दावे, परमबीर सिंग यांच्या कथित भूमिकेबाबतचे आरोप आणि पुढील तपासाची आवश्यकता याबाबत न्यायालयासमोर सविस्तर मांडणी केली जाणार आहे.अँटिलिया प्रकरणात यापूर्वीच सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह १० आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले असून खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा परिस्थितीत घाडगे यांनी केलेले आरोप आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या युक्तिवादानंतर न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Arshad Warsi: या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला, नेमका वाद काय?
  • मी टिकली घेऊन लगेच येते; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी गायब, नेमकं काय घडलं?
  • भारताचा चीनला दणका, थेट भूतान येणार भारतीय रेल्वेच्या नकाशावर, ज्याची भीती तेच घडतंय..
  • Nepal Flood Alert: नेपाळमध्ये पुन्हा महापुराची धास्ती; नदीचा आवाज वाढताच नागरिकांना अलर्ट
  • मूल जन्माला घालण्यास अभिनेत्रीचा नकार, गडगंज श्रीमंत नवऱ्याने थेट दिला घटस्फोट, अक्षय कुमारची एक्स गर्लफ्रेंड आता असं जगतेय आयुष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in