• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Yuzvendra Chahal : ती आयुष्यातून गेल्यावर.. युझवेंद्र चहलला होतोय प्रचंड पश्चाताप, म्हणाला – आता कधीच…

May 22, 2026 by admin Leave a Comment

युजवेंद्र चहल सध्या भारतीय क्रिकेट संघात खेलत नसला तरी तो बराच चर्चेत असतो. आयपीएलमध्येही त्याचा सहभाग असून तेथील एका वादग्रस्त कृतीमुळे तो स्पॉटलाइटमध्ये आला होता. नुकतीच त्याने ‘कँडिड विद किंग्स’ या पॉटकास्टमध्ये हजेरी लावली. भारतीय महिला क्रिकेटर हरलीन देओल हिच्याशी तो मनमोकळेपणाने बोलला. याचवेळी तो यामध्ये तो त्याच्या आयुष्यातील चढउतार, त्याने केलेल्या चुकांबद्दल बोलला. एका गोष्टीचा त्याला मोठा पश्चाताप होतोय.

पंजाब किंग्सच्या ऑफिशिअल यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या संभाषणादरम्यान चहलने दारूपासून लांब राहण्याचा निर्णय, डिप्रेशनशी दिलेला लढा आणि क्रिकेटशी निगडीतकाही हलके-फुलके अनुभवही शेअर केले.

ती आयुष्यातून गेल्यावर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं

संभाषणाला सुरूवात करताना हरलीनने त्याला ड्रिकिंगबद्दल विचारलं. तू ड्रिंक करणं( दारू पिणं) सोडलसं ना ?

त्यावर चहलने मनमोकळेपणाने उत्तर दिलं. ” मला वाटतं (दारू सोडणं) हा माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम निर्णय आहे. ती (दारू) माझ्या आयुष्यातून हटवल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे, असं मी म्हणू शकतो. आता मी माझं कुटुंब आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवतो. माझ्या आयुष्यात काय चाललंय, कोण माझ्यासोबत आहे, कोण नाही हे सगळं जास्त स्पष्टपणे समजू लागलं आहे. आधी मी या सगळ्या गोष्टींबद्दल खूप विचार करायचो. पण आता मी माझ्यावर फोकस करतो. मी गोल्फ खेळतो, गो-कार्टिंगसाठी जातो ” असं चहलने सांगितलं.

पुढे तो म्हणाला, “ त्यामुळे आता मला जाणीव होत्ये की मी माझ्या आयुष्यात काय मिस केलंय. दारू माझ्यासाठी योग्य नाही, ती चांगली नाही हे लक्षात आल्यावर मी निर्णय घेतला. असं होतं ना की तुम्ही एखादी लिमिट क्रॉस करता, मी पण त्याच स्टेजला पोहोचलो होतो. त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये होते, माझी मानसिक अवस्थाही चांगली नव्हती. मग मी स्वत:च निर्णय घेतला ” असंही चहलने नमूद केलं.

“मी यूकेमध्ये काउंटी क्रिकेट खेळत होते, तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘नाही, मला परत जाऊन हे सुधारायलाच हवं.’ आता (दारू सोडून) सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि मला खूप आनंद व कृतज्ञता वाटते,” असं चहलने सांगितलं.

युजवेंद्र चहल याने आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना 13 सामन्यांमध्ये 10 बळी टिपले. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात संघाने त्याला 18 कोटी रुपयांना विकत घेतले. पंजाब किंग्सच्या आधी, युजवेंद्र चहल हा राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांकडूनही खेळला आहे. त्याने एकूण 187 आयपीएल सामने खेळले असून 231 बळी घेतले आहेत, ज्यात एका पाच विकेट्सच्या कामगिरीचा समावेश होता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in