
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अ गटात उपांत्य फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड हे संघ आहेत. यापैकी पाकिस्तान नेदरलँड संघ स्पर्धेतील तीन सामने खेळल्यानंतर आऊट झाले आहे. या दोन्ही संघांनी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे या दोन संघांना उर्वरित दोन सामने औपचारिक असणार आहेत. मात्र एखाद्या संघाचं चित्र पालटू शकतात. या गटात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. दुसरीकडे, दुसऱ्या जागेसाठी भारत, दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. भारताने या स्पर्धेत खेळलेल्या तीन पैकी दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित आता जर तर वर आलं आहे.
भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलँडला पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित आता जर तर वर आलं आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. भारताचा पुढचे दोन सामने बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. पण एक सामना गमावला तर कठीण आहे.
दोन्ही सामन्यात विजय आणि उपांत्य फेरीचं तिकीट
भारताचा 25 जून रोजी सामना बांगलादेशविरुद्ध, तर दुसरा सामना 28 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. कारण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेचे 8 गुण असले तरी भारताचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे या गटात अव्वल दोन मध्ये स्थान आरामात मिळेल.
दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशच्या कामगिरीवर लक्ष
भारत, दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांचे प्रत्येकी 4 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत भारत पुढे असल्याने दुसऱ्या स्थानी आहे. भारताला पुढच्या फेरीत पात्र ठरण्यासाठी दक्षिण अफ्रिकेने नेदरलँड किंवा बांगलादेशविरुद्धचा एक सामना गमवणं फायदेशीर ठरेल. अफ्रिकेने दोन्ही सामने जिंकले तर नेट रनरेटवर गणित असणार आहे. सध्या भारताचा नेट रनरेट हा +2.511 आहे. तर दक्षिण अफ्रिकेचा नेट रनरेट हा -0.546 आहे. त्यामुळे भारताला अशा स्थितीत संधी मिळेल.
एका सामन्यात पराभव झाला तर…
भारताला उर्वरित दोन पैकी एका सामन्यात पराभव झाला तर सर्व गणित जर तर वर येईल. कारण भारताच्या पारड्यात 6 गुण होतील. अशा स्थितीत दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशच्या इतर सामन्यांच्या निकालावर लक्ष ठेवावं लागेल. तसेच नेट रनरेटही महत्त्वाची भूमिका बजावेल.
Leave a Reply