• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WT20 WC 2026: इंग्लंडच्या विजयामुळे वेस्ट इंडिजचं झालं भलं, सामना गमवूनही मिळाल उपांत्य फेरीचं तिकीट

June 28, 2026 by admin Leave a Comment

ICC Women’s T20 World Cup 2026: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या गट 2 च्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने जबरदस्त कामगिरी केली. द ओव्हल या ऐतिहासिक मैदानात इंग्लंडने न्यूझीलंडला 9 विकेट राखून पराभूत केलं. या विजयासह या गटातील उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरला आहे. इंग्लंडनंतर वेस्ट इंडिजला या गटातून उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली आहे. या गटातील शेवटच्या सामन्यात खरं तर वेस्ट इंडिजचा पराभव झाला होता. त्यामुळे सर्व काही इंग्लंड न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून होतं. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आणि वेस्ट इंडिजने नेट रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरीत जागा पक्की केली.

वेस्ट इंडिजला नशिबाने दिली साथ

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इंग्लंड न्यूझीलंड सामना होण्यापूर्वी वेस्ट इंडिज आणि आयर्लंड हे संघ भिडले. या सामन्यात वेस्ट इंडिजने 20 षटकात 7 गडी गमवून 128 केल्या आणि विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान आयर्लंड संघाने 18.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवामुळे वेस्ट इंडिजची धाकधूक वाढली होती. सर्व नजरा या इंग्लंड न्यूझीलंड सामन्याकडे लागल्या होत्या हा सामना न्यूझीलंडने मोठ्या फरकाने जिंकल्यास वेस्ट इंडिजचा पत्ता कापला जाणार होता. पण इंग्लंडने या सामन्यात न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. न्यूझीलंडने विजयासाठी 20 षटकात 6 गडी गमवून 163 धावा दिल्या होत्या. या धावा इंग्लंडने 17.2 षटकात एक गडी गमवून पूर्ण केल्या.

गट 2 मधून इंग्लंड संघाने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला. यासह 10 गुण +2.134 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं. तसेच या गटातून एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर वेस्ट इंडिजने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवून 6 गुण -0.147 नेट रनरेटसह उपांत्य फेरीत पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला. खरं तर श्रीलंकेचं उपांत्य फेरीचं स्थान नेट रनरेटच्या थोड्याशा फरकाने हुकलं. श्रीलंकेचे 6 गुण आणि नेट रनरेट हा -0.725 आहे. तर न्यूझीलंडने 5 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in