• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WT20 WC: भारतासाठी सामना न खेळलेल्या खेळाडूने घेतली श्रेयंका पाटीलची जागा, आरसीबीच्या प्लेयरचं नशिब चमकलं

June 20, 2026 by admin Leave a Comment

Prema Rawat replacement for Shreyanka Patil: भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत विजयी सुरूवात केली. सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी जागा मिळवण्यासाठी लढा सुरू केला आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात स्टार फिरकीपटू आणि अष्टपैलू श्रेयंका पाटीलला दुखापत झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकली आहे. श्रेयंका पाटीलला ही दुखापत नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात झाली होती. आता तिची जागा भरून काढण्यासाठी बीसीसीआयने एका खेळाडूची निवड केली आहे. तिच्या नावाची घोषणा केली असून ती इंग्लंडला संघासोबत असणार आहे. श्रेयंका पाटीलची जागा घेणाऱ्या खेळाडूने भारतासाठी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनकॅप्ड फिरकीपटू प्रेमा रावत हिला संघात स्थान दिलं गेलं आहे. प्रेमा रावत पहिल्यांदाच भारतीय संघाकडून खेळणार आहे. प्रेमा रावत इंडिया ए संघासोबत आधीपासून इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे तिला त्या वातावरणाशी जुळवून घेण्यात फार काही अडचण येणार नाही.

प्रेमा रावतची निवड करण्याचं कारण की…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने श्रेयंका पाटीलच्या रिप्लेसमेंट म्हणून प्रेमा रावतच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता प्रेमा रावत आता भारतीय महिला संघात रुजू होणार आहे. प्रेमा रावतने वुमन्स प्रीमियर लीग आणि आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत प्रेमा रावत आरसीबीकडून खेळते.इंडिया ए कडूनही तिने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करत 9.62 च्या सरासरीने 8 विकेट घेतल्या होत्या.आयसीसी नियमानुसार, स्पर्धेत एखाद्या खेळाडूला संघात सहभागी होण्यासाठी इव्हेंट टेक्निकल कमिटीची अधिकृत परवानगी घ्यावी लागते. या कमिटीत वसीम खान (चेअरमन), गौरव सक्सेना, बेथ बॅरेट-वाइल्ड आणि स्टेसी फ्लेमिंग यांचा समावेश आहे.

India suffer huge injury blow at the #T20WorldCup.https://t.co/USoyWDD8JS

— ICC (@ICC) June 18, 2026

श्रेयंका पाटीलसोबत काय घडलं?

श्रेयंका पाटील नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पहिलं षटक टाकताना फिल्डिंग करताना तिचा पाय मुरगळला होता. वेदना असह्य झाल्यानंतर ती मैदानात बसून राहिली. श्रेयंका मिड ऑनकडे जाणारा चेंडू अडवण्यासाठी स्वत: धाव घेतली. यावेळी घटना घडली. त्यानंतर तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागलं. वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतही टीम इंडियाला असाच फटका बसला होता. तेव्हा प्रतिका रावल फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. तेव्हा तिची जागा शफाली वर्माने घेतली होती.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in