• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WIW vs SLW : मी अपयशी कर्णधार, चमारी अट्टापट्टूला विंडीज विरुद्धचा पराभव जिव्हारी, काय म्हणाली?

June 22, 2026 by admin Leave a Comment


श्रीलंका टीमचा आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाला. विंडीज विरूद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टू हीने नाराजी व्यक्त केली. चमारीने स्वत:ला अपयशी कर्णधार असल्याचं म्हटलं. (Photo Credit :PTI)

Chamari Athapaththu INDW vs SLW

वेस्ट इंडिज विरुद्धचा पराभव शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. मी श्रीलंकेसाठी 18 वर्षांपासून खेळतेय. मात्र एकदाही श्रीलंकेला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरले नाही. मी खेळाडू म्हणून खूप काही मिळवलंय. मात्र मी कर्णधार म्हणून अपयशी आहे”, असं चामरीने म्हटलं. (Photo Credit :PTI)

Chamari Athapaththu SLW

चामरी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व पर्वात सहभागी होणाऱ्या मोजक्याच खेळाडूंपैकी एक आहे. चामरी 18 वर्षांत 10व्यांदा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहे. चामरीचा हा कदाचित अखेरचा टी 20i वर्ल्ड कप असू शकतो. पुढील टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 2028 साली करण्यात येणार आहे. तेव्हा चामरी 38 वर्षांची असेल. (Photo Credit :PTI)

SLW Captain Chamari Athapaththu

चामरीने या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेच्या निराशाजनक कामगिरीसाठी स्वत:ला कारणीभूत ठरवलं. “मी चांगले खेळले असते तर जिंकलो असतो. मात्र तसं झालं नाही.”, असं चामरीने म्हटलं. (Photo Credit :PTI)

Harmanpreet Kaur and Chamari Athapaththu

चामरीला वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात आतापर्यंत काही खास करता आलं नाही. चामरीने 3 सामन्यांत अवघ्या 33 धावा केल्या. तर 2 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit :PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट
  • Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ
  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in