• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Wimbledon: विम्बलडन चॅम्पियन्सला मिळणार आता 45 कोटींचं बक्षीस, पहिल्या फेरी बाद झालं तरी मोठी कमाई

June 27, 2026 by admin Leave a Comment


वर्ष 2026 मधील तिसरी ग्रँड स्लॅम आणि टेनिस जगातील प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. ही स्पर्धा 29 जूनपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा इतर स्पर्धांच्या तुलनेत खास असणार आहे. कारण इंग्लंड लॉन टेनिस क्लबने बक्षिसाची रक्कम 20 टक्क्यांनी वाढवली आहे. (Photo: Getty Images)

मागच्या काही महिन्यांपासून बक्षिसाची रक्कम वाढवण्यास काही प्रमुख खेळाडूंनी विरोध दर्शवला होता. आयोजकांकडून मिळणाऱ्या एकूण महसुलाच्या वाटप पद्धतीवर आणि टक्केवारीला तीव्र विरोध होता. मात्र असं असूनही विम्बल्डन आयोजक एईएलटीसीने या वर्षी बक्षिसाची रकमेत वाढ केली आहे. बक्षिसाची रक्कम जवळपास 821 कोटी रुपये गेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 20 टक्क्यांनी वाढवली आहे. (Photo: Getty Images)

बक्षिसाची रक्कम वाढवल्याने त्याचा आपसूक फरक खेळाडूंच्या कमाईवर होणार यात काही शंका नाही. पुरूष आणि महिला विजेत्यांना प्रत्येकी 3.6 मिलियन पाउंड म्हणजे जवळपास 45 कोटी रुपये मिळणार आहेत. मागच्या वर्षी 3 मिलियन इतकी बक्षिसी रक्कम होती. (Photo: Getty Images)

विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या म्हणजेच उपविजेत्या खेळाडूला जवळपास 22.5 कोटी रक्कम मिळणार आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 18 टक्क्यांनी वाढली आहे. (Photo: Getty Images)

विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाद होणाऱ्या खेळाडूंना चांगली रक्कम मिळणार आहे. मेन्स आणि वुमन्स एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाद होणाऱ्या खेळाडूला जवळपास 1 कोटी रक्कम मिळणार आहे. (Photo: Getty Images)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FIFA World Cup स्पर्धेत संघाने सामना जिंकताच राष्ट्रपतीनी राष्ट्रीय सुट्टी केली जाहीर, 20 वर्षानंतर असं घडलं
  • ही दोन झाडं म्हणजे सापांचे पक्के मित्र; जणू सापांचं दुसरं घरच, बागेत कधीच लावू नका
  • भारतात 30 जूनला लाँच होणार वनप्लस एन6, जाणून घ्या डिस्प्ले आणि कॅमेरा फिचर्स
  • दमदार फिचर्ससह लाँच झाला विवो एक्स फोल्ड 6 फोल्डेबल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फिचर्स
  • Tatkal Passport: आता 3 दिवसात घरी येईल तुमचा पासपोर्ट, अर्ज कसा करायचा वाचा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in