• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WI vs SL : विंडीज दौऱ्यातील 3 मालिकांसाठी श्रीलंका टीमची घोषणा, कॅप्टन बदलला, कुणाला संधी?

May 25, 2026 by admin Leave a Comment


श्रीलंका क्रिकेट टीम जून महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of West Indies 2026) जाणार आहे. श्रीलंका या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे, टी 20i आणि कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 मालिकांमध्ये 8 सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 3 जून ते 7 जुलै दरम्यान 3 मालिकांचा थरार रंगणार आहे. श्रीलंकेने या तिन्ही मालिकांसाठी सोमवारी 25 मे रोजी संघ जाहीर केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने संघ जाहीर करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

कुसल मेंडीस नवा कर्णधार

श्रीलंका निवड समितीने वनडे आणि टी 20i क्रिकेट मालिकेसाठी संघ जाहीर करताना मोठा निर्णय घेतला आहे. निवड समितीने व्हाईट बॉल सीरिजसाठी कॅप्टन बदलला आहे. कुसल मेंडीस याला टी 20i आणि वनडे टीमचा कॅप्टन करण्यात आलं आहे. कुसल चरिथ असलंका याच्या जागी नेतृत्व करणार आहे. तर धनंजय डी सिल्वा कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रीलंकेच्या विंडीज दौऱ्याची सुरुवात वनडे सीरिजने होणार आहे. तर कसोटी मालिकेने सांगता होणार आहे. तर या दरम्यान टी 20i मालिकेचा थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : कुसल मेंडिस (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिश्रा, पवन रथनायके, जेनिथ लियानागे, चारिथ असलंका, कामिंदू मेंडिस, मिलन रथनायके, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, महीश तीक्षणा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका, एशान मलिंगा, असिथा फर्नांडो आणि प्रमोद मदुशन.

टी 20I सीरिजसाठी श्रीलंका टीम : कुसल मेंडिस (कॅप्टन), पाथुम निसांका, कामिल मिश्रा, लसिथ क्रोस्पुले, पवन रथनायके, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, मिलन रथनायके, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महीश तीक्षणा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका, एशान मलिंगा, बिनुरा फर्नांडो आणि नुवान तुषारा.

एकदिवसीय आणि इतर मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना : 3 जून

दुसरा सामना : 6 जून

तिसरा सामना : 8 जून

टी 20i मालिका

पहिला सामना : 12 जून

दुसरा सामना : 14 जून

तिसरा सामना : 15 जून

कसोटी मालिका

पहिला सामना : 25 ते 29 जून

दुसरा सामना : 3 ते 7 जुलै

श्रीलंका विंडीज दौऱ्यासाठी सज्ज

Sri Lanka Tour of West Indies 2026🏏
Sri Lanka Cricket’s Selection Panel has selected the following squads for Sri Lanka’s Tour of the West Indies 2026.
The tour will feature matches across all three formats – ODI, T20I, and Test cricket.
The tour will begin with the ODI series,… pic.twitter.com/rnZYZZHm0S

— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) May 25, 2026

टेस्ट सीरिजसाठी श्रीलंका टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, लाहिरू उदारा, निशान मदुष्का, दिनेश चंडिमल, पसिंदू सूरियाबंदरा, कामिंदू मेंडिस, सोनल दिनुषा, कुसल मेंडिस, मिलन रथनायके, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडीस, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, लाहिरू कुमारा, इसिथा विजेसुंदर आणि कसून रजिथा.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?
  • ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in