• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

West Bengal Assembly Election 2026 : हुमायूं कबीरच्या कारवर हल्ला, भाजप उमेदवाराला पळवून-पळवून मारलं, पश्चिम बंगालमध्ये रक्तरंजित संघर्ष

April 23, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. या दरम्यान तिथे हिंसाचार पहायला मिळतोय. एकाबाजूला मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर पोहोचतायत. दुसरीकडे राज्याच्या विभिन्न भागात जाळपोळ, मारहाण आणि तोडफोडीचे गंभीर प्रकार घडले आहेत. मुर्शिदाबाद, कूचबिहार, सिलिगुडी आणि मालदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद, राडे सुरु आहेत. मुर्शिदाबादमध्ये समाजकंटकांनी हुमायूं कबीरच्या कारवर लाठ्या काठ्यांनी आणि विटांनी हल्ला केला. AJUP प्रमुख आणि रेजीनगरचे उमेदवार हुमायूं कबीर यांच्या ताफ्यावर मुर्शिदाबादच्या नौदामध्ये लाठ्या काठ्यांनी आणि विटांनी हल्ला करण्यात आला. यावेळी टीएमसी आणि AJUP च्या कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. कबीर यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत वादावादी सुद्धा झाली. त्यांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे.

कूचबिहारच्या तूफानगंज भागात मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात जमाव जमला. त्यामुळे तणाव वाढलेला. स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसताच केंद्रीय सशस्त्र पोलीस पथकाने हस्तक्षेप केला. सुरक्षापथकांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवलं. काही समाजकंटकांनी मतदारांना घाबरवण्याच प्रयत्न केला असा आरोप होत आहे. त्यानंतर जवानांनी बल प्रयोग केला.

विचलित करणारी घटना

दक्षिण दिनाजपुरच्या कुमारगंज विधानसभा क्षेत्रात एक विचलित करणारी घटना घडली. भाजपा उमेदवार सुवेंदु सरकार यांच्यावर कथितरित्या तृणमूल काँग्रेस समर्थकांनी हल्ला केला. सुवेंदु सरकार यांना विशेष बूथवर ‘बूथ जॅमिंग’ सुरु असल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा तिथे ते आपल्या टीमसोबत पोहोचले, तेव्हा त्यांच्यावर लाठी काठ्यांनी हल्ला करण्यात आला. पोलिसांसमोर टीएमसीच्या गुंडांनी मला मारहाण केली असा सुवेंदु सरकार यांनी आरोप केला आहे.

निवडणूक अधिकाऱ्याला बनवलं बंधक

मालदाच्या मोथाबाडी विधानसभा क्षेत्रात बालुआचारा हाय स्कूल येथील मतदान केंद्राबाहेर EVM मशीन खराब झाल्यानंतर स्थानिक लोक संतप्त झाले. निवडणूक आयोगाचा अधिकारी उशीरा पोहोचल्याने लोक भडकले. त्यांनी अधिकाऱ्याला घेरलं व बंधक बनवलं. अनेक मतदार अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्याला खेचत होते. मालदा जिल्ह्याच्या हरिश्चंद्रपुर विधानसभा क्षेत्रात तृणमूल काँग्रेसचे दोन गट आपसात भिडले. त्यानंतर तिथे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

#WATCH | West Bengal Elections 2026 | Visuals of the violence in Murshidabad as a clash broke out between TMC and Aam Janata Unnayan Party (AUJP) party workers.

Stones are also being pelted at each other. Police and central security forces try to control the situation. pic.twitter.com/ScMeW1gSNJ

— ANI (@ANI) April 23, 2026

सिलीगुडीच्या जगदीश चंद्र विद्यापीठ येथील बूथ नंबर 26/237 वर मतदानादरम्यान मतदान केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद सुरु झाला. बघता, बघता वाद इतका वाढला की, दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की सुरु झाली.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्षांआधी पैसे काढता येतात का? जाणून घ्या काय सांगतो नियम
  • IPL 2026 Purple Cap : ऑक्शनमध्ये फक्त 30 लाखात विकत घेतलं, आता पर्पल कॅपच्या शर्यतीत बनला नंबर 1, स्टार गोलंदाजांना टाकलं मागे
  • तुमची तुळस वारंवार सुकतेय? मग आजच कुंडीत एक चमचा…
  • ‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यात डान्स करून मिळवली ओळख, बनली नंबर-1 डान्सर, आता कुठे आहे ही अभिनेत्री?
  • मी संतापाने धुमसतोय.., सहअभिनेत्रीनेच पैसे देऊन चालवलं ‘हेट कँपेन’? सेटवर जोरदार भांडणानंतर अभिनेत्याची पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in