• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Weather Forecast : विदर्भात उष्णतेची लाट कायम, धोका वाढला, या जिल्ह्यांना रेड अलर्ट

May 28, 2026 by admin Leave a Comment


गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलास मिळाला आहे. मात्र दुसरीकडे  अजूनही विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस नागरिक घराच्या बाहेर पडणं टाळत असून, रस्त्यावंर शुकशुकाट पहायवला मिळत  आहे. आज चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पर्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट 

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्याला आज उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  तर शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून जिल्हा अक्षरशः होरपळून निघाला असून, आणखी पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

वाशिममध्ये शुकशुकाट 

वाशिममध्ये देखील प्रचंड उकाडा जाणवत आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. दरम्यान बुधवारी वाशिम जिल्ह्यात 43. 2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली होती.  तर आज हवामान विभागाने वाशिम जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत वाशिम शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुख्य रस्त्यावर नागरिकांची व वाहधारकाची वर्दळ कमी झाली असून, अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता 

दरम्यान उद्यापासून विदर्भात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून विदर्भातील तापमानात 3  ते 5 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  विदर्भातील तापमान 40 अंंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकतं. सध्या तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.  दरम्यान विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे.

मान्सूनचं आगमन लांबलं 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार परिस्थितीमुळे मान्सूनचं आगमन लांबल्याचं पहायला मिळत आहे. एक जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. अंदमानात मान्सून दाखल होवूनही मान्सुनचा पुढचा प्रवास रखडला आहे. दरम्यान मान्सुन केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची दिशा सष्ट होईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in