• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

VVS Laxman: बीसीसीआयचा गंभीर, आगरकरांना ठेंगा, व्हीव्हीएस लक्ष्मणला देणार सर्वात मोठं पद

August 14, 2026 by admin Leave a Comment


सध्या भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल सुरु आहेत. आताच श्रीलंकेविरुद्ध मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल झालेला दिसला. आधी भारतीय संघाचे असिस्टंट कोच हे रियान टेन डोईशेट होते. आता भारतीय संघाने कोचिंग स्टाफमध्ये सुभदीप घोष यांची निवड केली आहे. आता या दरम्यान भारतीय संघाचा मुख्य कोचही बदलला जाईल असं म्हटले जात होते, व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाचे कार्यभर हाती घेणार असं म्हटले जात होते, पण अशी काही चिन्हे दिसत नाही. यातच आता व्हीव्हीएस लक्ष्मणला बीसीसीआय एक पद देणार आहे जे सर्वात मोठे आहे.

भारताचे माजी फलंदाज आणि सध्या बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण, गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडकर्ता होणार असल्याची चर्चा आहे. ते कसोटी प्रशिक्षकहोतील अशीही अटकळ होती, परंतु हा माजी फलंदाज दोन्ही पदे सोडून एक नवीन भूमिका स्वीकारू शकतो. बीसीसीआय लक्ष्मण यांना अधिक महत्त्वाचे पद देण्याचा विचार करत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआय लक्ष्मण यांना डायरेक्टर ऑफ क्रिकेट पद देऊ शकते. हे पद एकेकाळी रवी शास्त्री यांच्याकडे होते, जे नंतर संघाचे प्रशिक्षक झाले.

बीसीसीआय सप्टेंबरमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळही सप्टेंबरमध्ये संपत आहे. बीसीसीआय कसोटी संघाच्या कामगिरीवरही नाराज आहे आणि कोचिंग स्टाफ चौकशीच्या फेऱ्यात आहे. परिणामी, परिस्थिती सुधारण्यासाठी बीसीसीआय अनेक उपाययोजनांचा विचार करत आहे, ज्याच्या केंद्रस्थानी लक्ष्मण आहेत. इंडिया टुडेने सूत्रांचा हवाला देत लिहिले आहे की, लक्ष्मण यांना डायरेक्टर ऑफ क्रिकेट पदाची भूमिका दिली जाऊ शकते.

लक्ष्मण सध्या CoE मध्ये कार्यरत असून त्यांना देशातील युवा खेळाडूंची चांगली जाण आहे. ते भारतीय संघाच्या पुढील पिढीला घडवत आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान दिसून आल्याप्रमाणे, ते गरजेनुसार टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहतात. जर बीसीसीआयने लक्ष्मण यांच्यावर ही जबाबदारी सोपवली, तर त्यांच्या कामाचा भार निश्चितच वाढेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी भाजपासाठी तयारी, आता शिंदे गटाच्या वाटेवर, धाराशिवच्या त्या 5 नगरसेवकांची राज्यात चर्चा
  • प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
  • रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा!
  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in