• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Viral Girl Rhiya Ahir : गाडी अंगावरून गेली असती तरी…एकटी पोलिसांना नडणाऱ्या रिया अहिरने सांगितलं मुंबईच्या आंदोलनात काय घडलं?

July 23, 2026 by admin Leave a Comment


Mumbai Protets Viral Girl Rhiya Ahir : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. देशभरात स्थानिक पातळीवरही आंदोलन केले जात आहे. काहीही झालं तरी आम्हाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतूनही पाठिंबा मिळत आहे. 22 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात एका धाडसी तरुणींना एकटीने पोलिसांची व्हॅन रोखली. तिच्या या हिमतीचे कौतुक केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या याच व्हायरल तरुणीने टीव्ही 9 मराठीशी बातचित केली आहे.

आपल्यासोबत जे चुकीचं घडतंय…

रिया अहिर असे या तरुणीचे नाव आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना आंदोलनादरम्यान काय घडलं? तिने पोलिसांची व्हॅन का अडवली, या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. “मी माझ्या मित्रांची वाट पाहात होते. मला यावेळी दुरून आझादीचे नारे ऐकायला येत होते. आपल्याला स्वातंत्र्य तर अगोदरच मिळालेलं आहे. पण आपल्यासोबत जे चुकीचं घडतंय, अत्याचाराविरोधात आवाज उठवणं फार गरजेचं आहे. माझ्या मित्रांना उशीर होत होता. एक तर मुंबईत पार्किंची अडचण आहे. त्यामुळे अर्धे आंदोलन संपलेले होते. त्यामुळे मला वेळ वाया घालवायचा नव्हता,” असं तिनं सांगितलं.

ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते

तसेच, पुढे बोलताना, मी एकटीच होते. माझ्यासोबत माझे मित्र नव्हते. मला इन्स्टाग्रामवरूनच लोक आम्ही पण आंदोलनात यावं का, असं विचारत होते. मी त्या सगळ्यांनाच या म्हणत होते. सरकारकडे सत्ता आहे. ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आपण आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे. मला अगोदर भीती वाटली होती, असंही तिने बोलून दाखवलं.

मला शहीद व्हायला आवडेल

“मी तेव्हा जिथे उभी होते तेव्हा ते मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस गाडी हळूहळू चालवत होते. मी करेंगे या मरेंगे असं ठरवलं. गाडी माझ्या अंगावरून गेली असती तरीही मला त्याची पर्वा नव्हती. मी शहीद झाले असते. मला पीडित नागरिक म्हणून जगण्यापेक्षा मला शहीद व्हायला नेहमी आवडेल,” असं तिने ठणकावून सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Harjani (@sapnaharjani_)

सर्वोच्च न्यायालय, संयुक्त राष्ट्राला मेल केला

तसेच सर्वांनीच या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं असल्याचं मत तिने व्यक्त केलं. आम्ही आमचा आवाज उठवत राहू. आंदोलन करत राहू. आजपासून मुंबईत आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे. लोक जिथे आंदोलन करत आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पाठिंबा देता येऊ शकतो. या आंदोलनाचे व्हिडीओ शेअर केले पाहिजेत, लाईक केले पाहिजेत. मी सर्वोच्च न्यायालय, संयुक्त राष्ट्र यांना या आंदोलनाबाबत मेल केलेला आहे. कारण काहीतरी चुकीचं होत आहे, हे सांगणं गरचेचं आहे, असं मत तिने व्यक्त केलं.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in