• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vinod Kambli, MI vs SRH : थरथरते हात, अडखळती पावलं.. तरीही सचिनच्या टीमला सपोर्ट देण्यासाठी विनोद कांबळी वानखेडेवर, Video पाहून..

April 30, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026 सीझनमधील कालचा, 41 वा सामना हाँ मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. वानखेडेवर झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला आणि दोन्ही संघांनी 200 पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला. अटीतटीच्या या लढाईत, अखेरीस सनरायझर्स हैदराबाद विजयी ठरला. त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयी पताका फडकावली. मात्र, सामन्यामुळे निर्माण झालेल्या उत्साहाचा सर्वांनी आनंद घेतला. याच दजरम्ायन एक खास पाहुणाही सामना पाहण्यासाठी पोहोचला, तो होता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट डावखुरा फलंदाज विनोद कांबळी.. त्यान वानखेडेवर येऊन सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला.

वानखेडेवर आला विनोद कांबळी

विनोद कांबळी स्टेडियममध्ये दाखल होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी दोन व्यक्तींच्या मदतीने स्टेडियमच्या दिशेने चालत जाताना दिसले.  विनोदचे हात थरथरत होते, तो पावलं हळूहळू टाकत होता, तरीही त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम होतं.  यावेळी त्याचे चाहते त्याच्या तब्येतीची विचारपूस करताना आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती करतानाही दिसले. काही दिवसापूर्वी विनोद कांबळीची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा सुरू होती. तो हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती देखील समोर आली. मात्र तब्येत बरी नसतानाही, विनोद कांबळी काल खास मॅच पाहण्यासाठी मैदानात आला. तो लवकर बरा व्हावा, त्याची प्रकृती सुधारावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करत त्याला Get Well Soon अशा शुभेच्छाही दिल्या.

 

Vinod Kambli came to Wankhede Stadium today to watch the Mumbai Indians match. There was a time when he was considered an even better batsman than Sachin Tendulkar, but some bad habits ruined his career. Seeing him like this today doesn’t feel good, but it was nice to see that he… pic.twitter.com/AJOMh1FTX3

— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 29, 2026

तब्येत होती खराब

अलीकडेच, विनोद कांबळी याला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याची बातमी समोर आली होती. गेल्या दोन वर्षांपासून कांबळी याची प्रकृती खालावत आहे. सचिन तेंडुलकरचा बालपणीचे मित्र आणि उत्तम खेळाडू असलेल्या विनोद कांबळीला डिसेंबर 2024 मध्ये युरिनरी इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आरोग्याच्या समस्यांसोबतच विनोद कांबळी आर्थिक अडचणींचाही सामना करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

विनोद कांबळी याने काल स्टेडियमवर पहिल्यांदाच आयपीएल 2026 चा सामना पाहिला. कालच्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, रायन रिकल्टनच्या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 243 धावा केल्या. प्रत्युत्तर देताना, सनरायझर्स हैदराबादने एक ओव्हर शिल्लक असतानाच 244 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Operation Sindoor : आता वर्षभरानंतर राजनाथ सिंह यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठं सिक्रेट उघडं
  • सावधान! ऊसाचा रस पित आहात? डॉक्टरांचा थेट मोठा इशारा, आरोग्यावर अत्यंत घातक..
  • Congress: महाविकास आघाडीत काँग्रेसचा बॉम्ब, उमेदवारीवरून सस्पेन्स वाढला, त्या एका अटीने अडचणीत ठाकरे सेना?
  • MI vs SRH : हार्दिक पंड्या शार्दुल ठाकूरसोबत खूप चुकीचा वागला, मैदानावर असं केलं अपमानित
  • Ashok kharat : लिंगपिसाट खरातकडे सापडला काळा दगड, गूढ वाढलं; दगडावरून कोर्टातही खडाजंगी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in