• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vijay Patkar | माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका वाद काय?

May 25, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीपूर्वी मोठा वाद निर्माण झाला असून अभिनेते विजय पाटकर यांनी निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “एका मंत्र्यांच्या दबावामुळे मला उमेदवारी अर्ज भरू दिला नाही,” असा धक्कादायक दावा विजय पाटकर यांनी केला आहे.
सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू असून तब्बल दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे. यासाठी 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यातून 17 जणांची निवड होणार आहे. विजय पाटकर यांनी सांगितलं की, त्यांनी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता, मात्र काही लोकांनी राजकीय दबाव टाकत त्यांचा अर्ज प्रक्रियेतून रोखला. यावेळी त्यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही थेट निशाणा साधला. “महामंडळाचं अक्षरशः थडगं केलं गेलं आहे. कर्मचाऱ्यांना सात महिने पगार दिला नाही आणि आता मला त्यांच्या पॅनलमधून उभं राहण्यास सांगितलं जात आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, एका मंत्र्यांचा ओएसडी मागील काही दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून असून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पाटकर यांनी केला. “राजकारण्यांनी चित्रपट क्षेत्रात हस्तक्षेप करू नये,” असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं.
विशेष म्हणजे, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांचेही उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याचा दावा विजय पाटकर यांनी केला आहे. या सर्व आरोपांमुळे मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीभोवती नवा वाद निर्माण झाला आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in