• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषदेचा बिगुल वाजला, 9 जागांमध्ये मोठा खेला? क्रॉस वोटिंगचा कुणाला फटका? उद्धव ठाकरे यांची पुन्हा एंट्री?

April 16, 2026 by admin Leave a Comment


Vidhan Parishad Election 2026: राज्यसभेनंतर आता विधान परिषदेसाठी बिगुल वाजला. पुढील आठवड्यात 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. सध्याच्या विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप खेला करण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपच्या खात्यात 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडे प्रत्येकी एक जागा येईल. त्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची 13 मतं अतिरिक्त आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 17 मतं अतिरिक्त आहेत. ही अतिरिक्त मतं कुणाच्या पारड्यात पडतात आणि क्रॉस वोटिंगचा फायदा कुणाला होतो याविषयी मोठा काथ्याकूट सुरू आहे.

पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम

पुढील आठवड्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पुढील प्रक्रिया सुरू होईल. राज्यसभेसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी त्याग केला. शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची जागा सोडण्यात आली. तर आता विधान परिषदेसाठी काँग्रेस आग्रही आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढावे यासाठी ही प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीकडे अतिरिक्त 17 मतं आहेत. अजून 10 मतं मिळवल्यास आघाडीचा अजून एक सदस्य वाढू शकतो. अर्थात त्यासाठी मोठा कस लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांची पुन्हा एंट्री?

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक होईल. 9 पैकी 8 जागांवर सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात जातील. तर एका जागेवर कुणाला पाठवायचे यासाठी महाविकास आघाडीत जोर बैठका सुरू होतील. तर उर्वरीत एका जागेवर क्रॉस वोटिंग झाल्यास महाविकास आघाडीच्या हाती काही लागण्याची चिन्ह नाहीत. तर जर महाविकास आघाडीने दहा मतं खेचून आणल्यास मात्र मोठा खेला होईल. महाविकास आघाडीचे दोन नेते विधान परिषदेवर निवडून जातील.

राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख दावेदार होता. पण त्यांनी ही जागा शरद पवार यांच्यासाठी सोडली. काँग्रेसनेही त्यांच्या पारड्यात मतं टाकली. आता विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना पाठवायची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. पण जर तीनही पक्षांनी समन्वय साधत दहा मतं खेचून आणल्यास दोन नेते विधान परिषदेवर जाऊ शकतात. पण ही मोठी कसरत आहे. काँग्रेसने पाठिंबा नाही दिला तरी उद्धव ठाकरे हे सहज विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vinod Kambli | मागचं पुढचं काहीच आठवेना… माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; ब्रेन स्ट्रोकचा धोका
  • फक्त 3 कोटींचं बजेट अन् 450% चा तगडा नफा; सनी देओलच्या या चित्रपटाने बदललेली सर्वच गणितं
  • प्रॉपर्टी टॅक्सचे खास गणित, तुमच्या घराचा कर कसा ठरवला जातो? जाणून घ्या फॉर्म्युला
  • US-Iran War : होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव स्फोटक, अमेरिकेची नाकेबंदी, इराणचा इशारा – होर्मुझ पेटणार ?
  • tv9 Marathi Special Report | महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in