• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video Viral: सोया चाप अगदी चवीने खाता? मग हा व्हिडिओ पहा, किळसवाणा प्रकार पाहून तळापायाची आग मस्तकात जाईल

July 27, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर दरदिवशी काहीना काही व्हायरल होत असतं. दररोज लोक विविध प्रकारचे व्हिडिओ बनवतात आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि जे व्हिडिओ सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधून घेतात ते व्हायरल होतात. आता एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे मात्र खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे लोक संताप व्यक्त करत आहेत. या व्हिडिओमुळे लोकांचे मनोरंजन तर झाले नाही पण तळपायाची आग मस्तकात गेली आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा हॉटेलमधील जेवण जेवायचे का नाही हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सोयाबीन चाप बनवण्यासाठी जे पीठ मळले जाते. त्याचा आता व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणाल त्या पीठाभोवती गुंडाळले आहे आणि त्याला जमीनीवर लोळवले जात आहे. या व्हिडिओमुळे लोकांचा राग अनावर झाला आहे. हा व्हायरल व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका ट्विटर हँडलने दावा केला आहे की, हा व्हिडिओ सेक्टर 27 मधील आहे. या व्हिडिओनंतर, अन्न सुरक्षा विभागाच्या पथकांनी दिवसभर दुकानात शोध घेतला, पण त्यांना काहीही सापडले नाही. याबद्दलची अधिकृत माहीती समोर आलेली नाही. सेक्टर 18 मधील आटा मार्केट आणि सेक्टर 27 मधील इंदिरा मार्केट ही शहरातील प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच, लोकांनी सोयाबीन चाप  बनवण्याच्या अस्वच्छ पद्धतींविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली. 37 सेकंदांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुण मैदा किंवा गव्हाच्या पिठाचे मिश्रण तयार करताना दिसत आहे.

हम सबको सोया चाप बहुत पसंद होता है.. इसे भुन कर रोस्ट कर या सब्जी बना कर खाते है..

पर ये बनता कैसे है.. और कितनी सफाई से बनता है खुद देखिये सब.. pic.twitter.com/uKXpNSVoK6

— 😊 NiTu 😊 (@NituTiw81600052) July 26, 2026

हे मिश्रण स्वच्छ जागेत नव्हे, तर तळमजल्यावर तयार केले जात आहे. तो तरुण मिश्रणात लोळत ते मिसळत आहे, तर इतर कामगार पाईपद्वारे त्यावर पाणी ओतत आहेत. त्याच वेळी हे मिश्रण शिजवले जात आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की, ते मिश्रण तयार करत नसून, त्यासोबत खेळत आहेत, ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होत आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..
  • आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 24 तासांपेक्षा अधिक गोळीबार, 47 लोकांचा मृत्यू, 50 जणांचं अपहरण, मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in