• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

VIDEO : 1 नंबर, बाऊंड्री लाइनवर ग्लेन फिलिप्सने पकडलेली ही अद्भुत करिश्माई कॅच पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणालं

September 1, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत तुम्ही अनेक हैराण करणाऱ्या कॅचेस पाहिल्या असतील. पण तुम्ही अशी कॅच पाहिलीय का, जी कॅच पकडल्यानंतर फिल्डरलाच स्वत: वर विश्वास बसला नाही. सीपीएलमध्ये ग्लेन फिलिप्सने असा करिश्मा केला. बाऊंड्री लाइनवर त्याने एक जबरदस्त कॅच पकडली. ही कॅच घेतल्यानंतर ग्लेन फिलिप्सला स्वत:वर विश्वास बसला नाही. काहीवेळ विचार करण्यासाठी तो मजबूर झाला. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. सीपीएल 2026 मध्ये ट्रिनबॅगो नाइट रायडर्स आणि गुयाना अमेज़न वॉरियर्समध्ये सामना होता. यावेळी ग्लेन फिलिप्सने बाऊंड्री लाइनवर सुनील नरेनची कॅच पकडली. सुनील नरेन ट्रिनबॅगो नाइट रायडर्ससाठी ओपनिंगला आला होता.

नरेनने ड्वेन प्रिटोरियसच्या चेंडूवर हुक शॉट मारला. फटका इतक्या जोरात मारलेला की मिडविकेटला थेट षटकार होता. फिलिप्स डिप मिडविकेटला उभा होता. फलंदाजाला वाटलं की सिक्स आहे. पण ग्लेन फिलिप्सने एका हाताने जबरस्त कॅच पकडली. पाहणारे सुद्धा हैराण होतील अशी ही कॅच आहे. चुंबकासारखा चेंडू फिलिप्सच्या हाताला चिटकला. ज्या चेंडूवर सहाधावा मिळणार होत्या, त्या चेंडूवर थक्क करणारी कॅच पकडली. हा झेल घेतल्यावनंतर फिलिप्सची जी प्रतिक्रिया होती, त्यावरुन काही क्षणासाठी त्यालाही विश्वास बसला नाही की, आपण हा झेल घेतलाय. सोशल मीडियावर या कॅचच खूप कौतुक होतय.

Glenn Phillips! Stop That! 🤯🤯🤯

A crazy one-handed catch from Phillips! 🇹🇹 x 🇬🇾#CPL26 #TKRvGAW #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport #OmegaXL pic.twitter.com/eFHMjjWf6U

— CPL T20 (@CPL) September 1, 2026

गुयाना अमेजन वॉरियर्सने पहिली बॅटिंग केली

नरेन 1 रन्सवर बाद झाला. गुयाना अमेजन वॉरियर्सने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 185 धावा केल्या. शिमरॉन हेटमायर 43 चेंडूत 111 धावांची नाबाद इनिंग खेळला. हेटमायरने आपल्या इनिंगमध्ये 8 चौकार आणि 9 षटकार लगावले.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सुभाष चंद्रा यांना मोठा झटका, कर्ज सेटलमेंटच्या आदेशाला स्थगिती, NCLT सुनावणीत घडलं काय?
  • देशात महागाईचा भडका, इंधन दरवाढीने ओला, रिक्षाचालक आर्थिक संकटात; सांगितली घरातील बिकट परिस्थिती
  • अरे बापरे… PNB बँकेच्या लॉकरमध्ये नकली नोटांचा डोंगर, लाखो रुपये गायब; मोठा खुलासा होताच…
  • साप, खेकडे आणि… 75 वर्षीय आजी अंधाऱ्या विहिरीत पडली, दोन दिवस मृत्यूशी संघर्ष, त्यानंतर जे घडलं…
  • VIDEO : 1 नंबर, बाऊंड्री लाइनवर ग्लेन फिलिप्सने पकडलेली ही अद्भुत करिश्माई कॅच पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणालं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in