• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video: वेस्ट इंडिजने पाकिस्तानला खुल्लमखुल्ला वेड्यात काढलं! फिल्डरने असं केलं की बाबर ठरला मूर्ख

July 29, 2026 by admin Leave a Comment

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला आणि वेस्ट इंडिजने पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं. या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 ने आघाडी घेतली आहे. खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ विजयापासून एक पाऊल दूर होता. पाकिस्तानने 9 गडी गमावले होते. पण वेगवान गोलंदाज जेडन सील्सने असा डाव टाकला की बाबर आझमला फक्त बघण्याशिवाय पर्याय उरला नाही. वेस्ट इंडिजने उघड उघड बेईमानी केल्याचा आरोप पाकिस्तानी क्रीडाप्रेमी करत आहेत. पाकिस्तानने 9 गडी गमावले होते आणि पराभवाच्या वेशीवर असतानाही बाबर आझम लढा देत होतो. तर गोलंदाज मोहम्मद अब्बासची त्याला साथ लाभली होती. पण वेस्ट इंडिजच्या डोक्यात काही वेगळं होतं आणि बाबरला जेडन सील्सने वेड्यात काढलं. शेवटची विकेट असल्याने बाबर आझम आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचा हा प्लान जेडन सील्समुळे फसला.

त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर काय झालं?

जोमेल वॉरिकन गोलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकला असलेल्या बाबर आझमने एका धावेसाठी फटका मारला. कारण त्याला त्याच्याकडे स्ट्राईक ठेवायची होती. पण जेडन सील्सने तसं होऊ दिलं नाही. आरामात अडवण्याचा चेंडू सोडला आणि चौकार गेला. त्यामुळे स्ट्राईक बदलली आणि समोर मोहममद अब्बास आला. त्याचा फायदा वेस्ट इंडिजला झाला. त्यानंतरचं षटक जेडन सील्स टाकण्यासाठी आला होता. समोर मोहम्मद अब्बास असल्याने आरामात आऊट करू असा विश्वास होता. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने अब्बासला पायचीत केलं. शेवटची विकेट गेल्यानंतर वेस्ट इंडिजच्या नावावर विजय नोंदवला गेला.

Last ball of the over.

Babar Azam looked for a single to keep strike.
Jayden Seales deliberately let the ball go for four so the tailender would face the next over.

Smart cricket or should he be fined?

What do you think? #wivpak pic.twitter.com/EzDPP1JSA5

— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) July 29, 2026

जेडन सील्सवर कारवाई होणार?

जेडन सील्सने जाणीवपूर्वक चेंडू सोडल्याने त्याच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. पण याबाबत आयसीसीचा नियम नाही. जर पंचांनी तक्रार केली तर सामनाधिकारी कारवाईचा बडगा उचलू शकतात. पण जाणीवपूर्वक चेंडू सोडण्याबाबत आयसीसीचा कोणताही नियम नाही. तसेच त्याबाबत कधी कोणती शिक्षाही झालेली नाही. कधी कधी फलंदाज पण दोन तीन धावा असूनही घेत नाहीत. त्यामुळे हा नियम क्षेत्ररक्षकालाही लागू होतं. विजयासाठी हा एक रणनितीचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर काही कारवाई असं वाटत नाही.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in