• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची कडक फिल्डिंग, प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्या वाजवून केलं कौतुक

July 19, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडने तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात इंग्लंडने 3 गडी गमवून 50 षटकात 387 धावा केल्या. तसेच विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं. भारतासमोर इंग्लंडचं कठीण आव्हान आहे. त्यामुळे विजयाच्या आशा थोड्या फार मावळल्या आहेत. तरीही विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज फलंदाजांकडून अपेक्षा आहेत. असं असताना या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या क्रिकेट किरकिर्दीतील शेवटचा सामना असेल अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र बीसीसीआयने या बातम्यांमध्ये काही दम नसल्याचं सांगून त्याची हवा काढून टाकली. त्यामुळे रोहित शर्माच्या कामगिरीकडे या सामन्यात लक्ष लागून होतं. पण प्रथम क्षेत्ररक्षण असल्याने चाहत्यांना 50 षटकं वाट पाहावी लागली. पण या दरम्यान रोहित शर्माने फिट अँड फाईन असल्याचं दाखवून दिलं. वयाच्या 39व्या वर्षी त्याचं क्षेत्ररक्षण पाहून मैदानातील प्रेक्षकही आवाक् झाले.

इंग्लंडने 42 षटकात 1 गडी गमवून 278 धावा केल्या होत्या. कर्णधार शुबमन गिलने 43वं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंगच्या हाती चेंडू सोपवला. जो रूट 39, तर बेन डकेट 133 धावांवर खेळत होते. त्यामुळे पुढच्या षटकात आक्रमक खेळी होणार हे अपेक्षित होतं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला जो रूट होता. त्याने बरोबर गॅपमधून चौकाराच्या दिशेने फटका मारला. त्यामुळे हा चेंडू कोणी अडवेल अशीही स्थिती नव्हती. पण 39 वर्षीय रोहित शर्माने चित्त्यासारखी धाव घेत शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. मोक्याच्या क्षणी उडी मारली आणि चेंडू चौकार जाण्यापासून अडवला. त्याची ही कामगिरी पाहून उपस्थित प्रेक्षक आवाक् झाले. या चेंडूवर चौकाराऐवजी फक्त 2 धावा आल्या.

How can a supposedly unfit Rohit Sharma still outperform younger players in the field at the age of 39?? pic.twitter.com/LlratLbx63

— Yorker__93 (@Boom__93) July 19, 2026

रोहित शर्माचं क्षेत्ररक्षण पाहून प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि त्याचं कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्यांनी सोशल मिडिया रंगलं होतं. पण त्याचं क्षेत्ररक्षण पाहून फिट अँड फाईन असून 2027 वनडे वर्ल्डकप खेळू शकतो अशा भावना आता व्यक्त होत आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in