• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि…

June 8, 2026 by admin Leave a Comment


युजवेंद्र चहल मागच्या काही वर्षांपासून फक्त आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसत आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा संपताच क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल स्पर्धेत फिरकीपटू युजवेंद्र चहल पंजाब किंग्सचा भाग होता. या स्पर्धेतील 14 सामन्यात 12 डावात त्याने 12 विकेट काढल्या. आयपीएल संपल्यानंतर आता युजवेंद्र चहलला आराम आहे. कारण त्याची निवड कसोटी, वनडे किंवा टी20 संघात झालेली नाही. असं असताना युजवेंद्र चहलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात युजवेंद्र चहल रोडवर बसून भीक मागताना दिसत आहे. युजवेंद्र चहलची ही स्थिती पाहून माजी भारतीय क्रिकेटपटून शिखर धवन याने त्याला फटकारलं. नेमकं काय घडलं त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

व्हायरल झालेल्या व्हिडीओत नेमकं काय?

युझवेंद्र चहल आणि शिखर धवन यांनी इंस्टाग्रामर एकत्रितपणे एक व्हिडीओ तयार करून पोस्ट केला आहे. या व्हिडीओत युजवेंद्र चहल रोडवर बसून भीक मागण्याची भूमिका करत आहे. युजवेंद्र चहलला अशा स्थितीत पाहून शिखर धवनने सांगितलं की, ‘लाज वाटत नाही का? रस्त्यावर बसून पैसे मागत आहेत.’ यावर युजवेंद्र चहल सांगतो की, ‘तुझ्या 10 रुपयांसाठी आता मी ऑफिस खोलून बसू का?’ हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. यापूर्वीही युजवेंद्र चहल आणि शिखर धवन यांनी असे मजेशीर व्हिडीओ शूट केले आहे. दोघंही सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

युजवेंद्र चहल ऑगस्ट 2023 मध्ये टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. म्हणजेच आता 3 वर्षांचा कालावधी लोटला असून संघात स्थान मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे आता त्याचं क्रिकेट करिअर फक्त आयपीएलपुरता मर्यादीत असेल असं वाटत आहे. युजवेंद्र चहलने टीम इंडियासाठी 72 वनडे, 80 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेतील 59 डावात 121, तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in