
देशभरात आणि महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनचे आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील एका व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधले आहे. पुण्यातही जोरदार सरी बरसत असल्याने आता अनेक ठिकाणी पाणी तुंबले असताना हा व्हिडीओ हास्यास्पद ठरत आहे. हा व्हिडीओ पुणे महानगर पालिकेच्या कारभाराचा उत्तम नमूना असल्याचे म्हटले जात आहे.पुणे महानगरपालिकेचा अजब कारभारामुळे भर पावसात कोथरूडमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना टँकरने पाणी घातले जात असल्याचे या व्हिडीओत दिसत असल्याने हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत पुणे नगर पालिकेचा कर्मचारी आकाशातून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु असताना रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या शोभेच्या झाडांना टँकरने पाणी देताना दिसत आहे. सर्वत्र पाऊस पडत असताना अशा प्रकारे झाडांना पाणी देणारे दृश्य पाहून पुणेकर तर हैराण झालेच परंतू सोशल मीडियावर हा व्हिडीओ यंत्रणेचा भ्रष्टाचार दाखवत आहे. जर आभाळातून धो..धो पाऊस पडत असताना अशा प्रकारे झाडांना स्वतंत्र पाणी देण्याची मुळात गरज काय ? असे साऱ्यांनाच वाटत असेल.
कोथरूडमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना पुणे महानगरपालिकेचे कंत्राटदार भर पावसात टँकरने पाणी देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती ट्रोल केला जात आहे. यावरुन विरोधकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे पुणे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे आणि पुण्यामध्ये भर पावसात झाडांना पाणी घातले जाते हा कारभार नक्की कुणासाठी आहे. ही सडकीबुद्धी कोणाची ? पावसामध्ये पाणी घातले जात आहे. हे पुणेकरांना शोभणारे नाही. पावसामध्ये पाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.
किती भ्रष्ट कारभार सुरू आहे
पावसात डिव्हायडर मधील झाडांना पाणी घातले जाते आणि त्याची बातमी टीव्ही वरती झळकली असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. महापालिका आयुक्तांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे. जेव्हा पाणी घालायचं होतं, तेव्हा पाणी घातलं नाही ना आता पावसामध्ये पाणी घालत आहेत, हे खर्च दाखवण्यासाठी सर्व सुरू आहे. किती भ्रष्ट कारभार सुरू आहे अशी टीका उबाठाचे नेते चंदन साळुंखे यांनी केली आहे.
येथे व्हिडीओ पाहा –
पुणे में बारिश हो रही है और पौधों को पानी डाला जा रहा है. एक तरफ जहां मुंबई और पुणे जैसे महानगरों में पानी की किल्लत है वहीं दूसरी ओर इस तरह का काम समझ कम ही आ रहा है….हालांकि वीडियो की सच्चाई कुछ और बताई जा रही है. pic.twitter.com/uqWgOzBRqR
— आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) July 4, 2026
Leave a Reply