• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastushastra : हातात पैसै टिकत नाही? मग शुक्रवारी करा हा सोपा उपाय, आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही

June 5, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाहीये. तर घरात जे वास्तुदोष निर्माण होतात, ते कसे दूर करावेत? त्यासाठी काय उपाय आहेत? याची देखील माहिती वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपण प्रचंड कष्ट करतो, मेहनत करून पैसा कमावतो. परंतु तो पैसा आपल्या हातात टिकत नाही. जसा आपल्या हातात पैसा येतो तसा तो खर्च होतो. मग असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तुमच्या हातात पैसा टिकत नाही, याचा अर्थ तुमचं आर्थिक नियोजन कुठेतरी चुकतं आहे, असा देखील होऊ शकतो. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुम्हाला आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होते. तुमच्यासमोर असे काही आर्थिक संकटं निर्माण होतात, ज्यामुळे तुमचं बँक बॅलन्स कमी होतं. हातात पैसा टिकत नाही. आज आपण वास्तुशास्त्रामधील असा एक उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी हळुहळु दूर होऊन, तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल.

शुक्रवारी करायचा उपाय – शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार असतो. लक्ष्मी माता ही धनाची देवता आहे, त्यामुळे शुक्रवारला हिंदू धर्मशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. तुम्ही दर शुक्रवारी पहाटे लवकर झोपेतून उठा, स्नान करून लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करा. तुमच्या देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो हा असायलाच हवा. लक्ष्मी मातेला तुम्ही पिवळं झेंडूच किंवा लाल जास्वंदाचं फूल वाहू शकतात. तसेच लक्ष्मी मातेला पुजेनंतर फळाचा नवैद्य अर्पण करावा. लक्ष्मी मातेची आरती करावी. जर तुम्ही दर शुक्रवारी हा उपाय केल्यास नक्कीच तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

इतर काही उपाय – या उपायासोबतच वास्तुशास्त्रात धनप्राप्तीचे इतर देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत. जसं की तुमच्या घराचं जे अंगण असतं, त्याचा बरोबर मध्य भाग ज्याला आप ब्रह्मस्थान म्हणतो, ते नेहमी स्वच्छ ठेवावं. ब्रह्मस्थानावर कधीही अडागळीचं सामान किंवा टाकाऊ वस्तू, जड वस्तू ठेवू नये. यामुळे धनप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुमच्या घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी, उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेरांची दिशा असते, तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला असलेल्या भिंतीला कुबेरांचा फोटो देखील लावू शकतात. त्यामुळे तुमच्या धन प्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in