• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastushastra : कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही? मग या तीन चुका टाळाच, तिजोरी पैशांनी भरून जाईल

May 25, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाही, तर आपण आपल्या आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, जेव्हा एखाद्याच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते, त्यामुळे घरात असलेल्या वास्तुदोषाचं निवारण करणं गरजेचं असतं, त्याबद्दल देखील वस्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुदोष निर्माण होणं म्हणजे नेमकं काय? तर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन तिची जागा नकारात्मक ऊर्जा घेते, ज्याचा परिणाम हा तुमच्या घरावर होतो, त्यालाच वास्तुदोष असं म्हटलं गेलं आहे.

आपल्यापैकी अनेकांना ही समस्या असते, की आपण प्रचंड कष्ट करतो, दिवस रात्र मेहनत करतो परंतु आपल्या हातात पैसा टिकत नाही. जेव्हा -जेव्हा आपल्याकडे पैसा येतो, तेव्हा -तेव्हा तो कोणत्या न कोणत्या कारणासाठी खर्च होतो. आपण अनेकदा अनावश्यक कारणांसाठी देखील मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो. होणाऱ्या खर्चावर आपलं नियंत्रण राहत नाही. हे असं का होतं? तर वास्तुशास्त्रानुसार यासाठी तुम्ही करत असलेल्या तीन चुका प्रामुख्याने जबाबदार असतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

स्वयंपाक घरात या वस्तू ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर हे ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. कराण तुम्ही स्वयंपाक घरात जेवण तयार करतात, तुम्ही जे अन्न ग्रहण करतात, त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळते, त्यामुळे स्वंयपाक घरात कधीही औषधं ठेवू नये, असं वास्तुशास्त्रता सांगण्यात आलं आहे, यामुळे तुमचा खर्च वाढतो.

बाथरूममध्ये या गोष्टी ठेवू नका – बाथरूममध्ये कधीही रिकाम्या बादल्या ठेवू नये, कारण सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा ही बाथरूममधून तयार होत असते, अशा स्थितीमध्ये तुम्ही जर बाथरूममध्ये रिकाम्या बादल्या ठेवल्या तर त्या ऊर्जेचा प्रभाव दुप्पट वाढतो, त्यामुळे हे टाळण्यासाठी बाथरूममध्ये बादल्या या नेहमी पाण्याने भरून ठेवाव्यात.

तिजोरी जवळ या वस्तू ठेवू नका -तुमची तिजोरी जर कपाटात असेल तर कपाटात कधीही जुन्या आणि निरपयोगी वस्तू ठेवू नका, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in