• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : हे चार फोटो घरात नकोच, आयुष्यात येतील अडचणी, वास्तुशास्त्र काय सांगतं?

September 7, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुमच्या घरात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की काहीही कारण नसताना अचानक वादविवाद होतात. कुटुंब प्रमुखाचं घरातील इतर सदस्यांसोबत पटत नाही. पती-पत्नीमध्ये सारखी भांडणं होतात. घर अशांत बनतं, दरम्यान याचा परिणामा हा तुमच्या घरातील लहान मुलांच्या मनावर देखील होतो, आणि कलांतराने अशी मुलं चिडखोर बनतात, हट्टी बनतात. एवढंच नाही तर तुम्हाला काही आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो, त्यामुळे घराची रचना नेहमी वास्तुशास्त्रानुसार असावी, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर असे देखील काही फोटो आहेत, ते घरात लावणं हे वास्तुशास्त्रामध्ये अशुभ सांगण्यात आलं आहे, अशा फोटोंमुळे घरात कधीही शातंता राहत नाही, चला तर मग जाणून घेऊयात, वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे.

युद्धाचे प्रसंग असलेले फोटो – वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्याच बाजूला युद्धाचे प्रसंग असलेला फोटो लावू नये. यामुळे घरातील शांतता भंग पावते आणि सारखे वादविवाद सुरू होतात. तुम्ही जर घरात असे फोटो लावले असतील तर ते आजच काढून टाका. या फोटोतून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर येते तिचा परिणाम हा तुमच्यावर पडत असतो, त्यामुळे कधीही घरात युद्धाचे प्रसंग असलेले फोटो लावू नका, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

हिंस्त्र प्राण्यांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात हिंस्त्र प्राण्यांचे फोटो देखील ठेवू नये, अशा प्रकारचे फोटो घरात ठेवणं वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. अशा प्रकारच्या फोटोंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, यामुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी देखील येऊ शकतात.

काटेरी वृक्षाचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कधीही काटेरी वृक्ष असलेल्या झाडांचे फोटो लावू नये, जसं की निवडूंग त्याचप्रमाणे कॅकट्स अशा प्रकारचे फोटो तुम्ही तुमच्या घरात लावल्यास त्यामुळे घराला बरकत प्रात होत नाही, हातात पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या बड्या बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले, तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
  • मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल
  • लॉलीपॉप ते चोर… शिवसेना भाजपात बँनरवॉर रंगलं, महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • Chanakya Niti : आचार्य चाणक्यांची ही शिकवण मुलींना देणार यश, तिसरा नियम अगदी सोपा!
  • 20 रुपयांच्या वडापावसाठी तरुणीने खर्च केले 15 हजार, चक्क फ्लाइट पकडून पोहोचली मुंबईत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in