• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : या गोष्टी जर तुमच्यासोबत वारंवार घडत असतील तर वेळीच व्हा सावध, असतात मोठे संकेत

July 4, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्यासोबत एखादी घटना घडणार असेल तर तिचे संकेत तुम्हाला आधीच मिळत असतात. जर तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडणार असेल जसं की तुम्हाला अचानकपणे धनाचा लाभ होणार असेल, नोकरीत प्रमोशन मिळणार असेल किंवा कोणीतरी पाहुणा तुमच्या घरी येणार असेल, अनेक दिवसांपासून तुमचं एखादं काम अडलं आहे, आणि ते आता पूर्ण होणार असेल तर अशावेळी तुम्हाल काही विशिष्ट संकेत मिळत असतात, हे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. त्याचप्रमाणे तुमच्यासोबत एखादी वाईट घटना घडणार असेल तरी देखील तुम्हाला त्या घटनेचे विशिष्ट संकेत मिळत असतात, विषेत: तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादी वाईट घटना घडणार असेल तर अशा गोष्टींचे संकेत हे मिळतच असतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही संकेतांबद्दल जाणून घेणार आहेत.

तुळस अचानक सुकणे – वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस हे झाडं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत आवडतं झाड आहे, ज्या घरामध्ये तुळस असते, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णू यांचा आर्शीवाद असतो. परंतु काही वेळेला आपल्या घरातील तुळस काहीही कारण नसताना अचानक सुकते, तुळस अचानक सुकणे हे एक मोठे संकेत असतात, भविष्यात तुमच्यासोबत काहीतरी मोठी घटना घडणार आहे, याचे ते संकेत असू शकतात.

स्वप्नात पूर्वजांचं दर्शन होणं – जर तुम्हाला एखाद्यावेळी तुमच्या पूर्वजांचं दर्शन झालं तर ही गोष्ट सामान्य आहे, मात्र जर वारंवार तुमच्या स्वप्नात तुमचे पूर्वज येत असतील तर या संकेताकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, असा होऊ शकतो, किंवा तुमच्या पूर्वजांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली आहे, असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अडी अडचणी येऊ शकताता, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in