• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra: महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय

June 11, 2026 by admin Leave a Comment


अनेकांसोबत असं होतं की, त्या व्यक्तीसाठी एखादं काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे काम कधी पूर्ण होईल याची वाटच तो व्यक्ती बघत असतो. परंतु जेव्हा असं वाटतं की आता हे काम होत आलं आहे, लवकरच त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे, अशा वेळी काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि ते काम अपूर्ण राहतं. अशावेळी खूप निराश व्हायला होतं. मात्र असं आपल्यासोबत का घडत असेल? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा हे आहे. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष तयार होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जसं की घरात पैसा टिकत नाही, भांडणं होतात. एखाद्या महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे निर्माण होतात. मात्र अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सूर्याला जल अर्पण करा – वास्तुशास्त्रानुसार दररोज सूर्य देवतेला जल अर्पण केल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात. दररोज पहाटे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावं. अंघोळ करावी अन् उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं. यावेळी सूर्यमंत्राचा जप देखील करावा. तसेच सूर्याला एखादं लाल फूल देखील अर्पण करावं. यामुळे तुमच्या पाठिमागचे सर्व कष्ट दूर होतात. तुमचं एखादं महत्त्वाचं काम अडलं असेल तर त्यातील अडथळे दूर होऊन ते काम पूर्ण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

हनुमानाला नारळ अर्पण करा – अनेकदा काय होतं की आपलं सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु आपलं चांगलं चालेलं काही लोकांना देखवत नाही, असे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात. त्यामुळे त्यांची नजर आपल्याला लागते. अशावेळी होत काय तर नजर लागल्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडळथे निर्माण होण्यास सुरुवात होते. यावर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, दर मगंळवारी भगवान हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांना एक नारळ अर्पण करावं, यामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होऊन, तुमचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘सनई चौघडे’मध्ये जय-शर्वरीच्या प्रेमकहाणीला सुरुवात; रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
  • मी लागतो नादाल चल, दाखव काय…, राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान
  • Sanjay Raut : विकासनिधीवरुन सरकारवर होणारा मोठा आरोप स्वत: राऊतांनीच काढला खोडून
  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in