• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : बुधवारी घरात लावलेली ही रोपं आयुष्यच बदलून टाकतात, नशीबात येतो राजयोग

June 29, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत, जी घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं. अशा झाडांमुळे घरात असलेले सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात. घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते. सुख, समृद्धी आणि पैशांची प्राप्ती होते, तसेच घराला आर्थिक स्थैर्य लाभते. परंतु ही झाडं लावण्याचे देखील काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं अशी असतात, जी विशिष्ट वारीच लावले गेले पाहिजेत. तर त्याचा अधिक चांगला प्रभाव हा तुमच्या आयुष्यावर पडतो. तुमच्या मागची सर्व प्रकारची इडा पीडा दूर होते आणि तुमच्या नशीबात राजयोग तयार होतो. आज आपण बुधवारी कोणती झाडं लावली पाहिजेत? आणि त्याचे फायदे काय काय आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं?

तुळशीचं रोप – हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं. ज्या घरात तुळस असते, त्या घरात आयुष्यात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तुळस हे झाड भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत आवडतं झाड आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो. मात्र तुळशीचं झाडं हे नेहमी बुधवारीच लावावं असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

गोकर्णीचं झाड – गोकर्णीला देखील हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. गोकर्णीच्या वेलाला निळे फुलं येतात. या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो, म्हणून या वेलाला गोकर्णी असं म्हटलं जातं. ज्या घरात गोकर्णीचा वेल असतो, अशा घराचं सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून संरक्षण होतं, असं मानलं जातं. तसेच बाहेरची कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. मात्र हे झाड बुधवारीच लावावं, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

पारिजातकाचं झाडं – दारामध्ये पारिजातकाचं झाडं असणं हे खूप शुभ मानलं जातं. ज्या घरात पारिजाकाचं झाडं असतं, अशा घरावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, तसेच अशा घराला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु हे झाड देखील बुधवारीच लावावं असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in