• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

June 14, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुदोषामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, तसेच घरातील सुख, शांती नष्ट होते. घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांना आपल्या पाकिटात वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याची सवय असते, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्ट असतात, त्या जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा गोष्टी पाकिटात ठेवू नये. तसेच अशा देखील काही गोष्टी असतात, ज्या तुम्ही पाकिटात ठेवल्या तर त्यामुळे तुमची आर्थिक भरभराट होते, तुमच्या प्रगतीमधील अडथळे दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात पाकिटात काय ठेवावं? आणि काय ठेवू नये? याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं त्याबद्दल.

पाकिटात काय ठेवू नये?

देवी देवतांचे फोटो- वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पाकिटात कधीही देवी देवतांचे फोटो ठेवू नये, यामुळे तुम्हाला कायम आर्थिक चणचण जाणवत राहते. ज्याप्रमाणे पाकिटात देवी देवतांचे फोटो ठेवू नये, त्याचप्रमाणे पाकिटात कधीही पूर्वजांचे फोटो देखील ठेवू नये. यामुळे देखील तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येतात.

जुने बिल – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पाकिटात कधीही जुने बिल ठेवू नये, यामुळे अनावश्यक खर्चामध्ये वाढ होते, आणि तुमच्या हातता पैसा टिकत नाही, त्यामुळे पाकिटात कधीही जुने बिल ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

चावी, लोखंडाच्या वस्तू – पाकिटात कधीही चावी किंवा लोखंडाच्या वस्तू जसं की पीन किंवा इतर गोष्टी ठेवू नये, यामुळे आर्थिक हानी होते. पाकिटामध्ये कधीही पैसे टिकत नाहीत. तसेच तुमच्यावरचं कर्ज देखील वाढतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

पाकिटात काय ठेवावे?

वास्तुशास्त्रानुसार पाकिटामध्ये एखादा सोनं किंवा पितळाच्या धातुचा तुकडा ठेवावा, गुरुवारच्या दिवशी या धातुच्या तुकड्याला गंगाजलाने धून तो तुमच्या पाकिटात ठेवावा, यामुळे तुमच्यावरील सर्व प्रकारचे आर्थिक संकट दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही पाकिटात मोर पीस देखील ठेवू शकतात, जर तुमच्यावर कर्ज झालं असेल तर या उपायामुळे तुमची लवकरच कर्जातून सुटका होईल, तसेच तुमच्या घराला आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता लाभेल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in