• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : पती-पत्नीचं पटत नाही; सारखे भांडणं होतात, मग बेडरूममध्ये हे दोन फोटो लावाच

July 7, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये तर अनेकदा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास  तुमच्या आयुष्यात विविध समस्या येऊ शकतात. जसं की सर्व सुरळीत सुरू असतानाच तुमच्या आयुष्यात अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. किंवा घरात अचानक आजारपण वाढतं. हातात आलेला पैसा टिकत नाही. तसेच अनेकदा काहीही कराण नसताना कुटुंबात कलह वाढतो. कुटुंब प्रमुखाचे घरातील इतर सदस्यांसोबत मतभेद होतात. पती-पत्नीचं पटत नाही, काही वेळा तर ही स्थिती अगदी घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकते, या सर्व गोष्टींवर वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

आज आपण जर पती-पत्नीचं पटत नसेल, त्यांच्यामध्ये सारखी भांडणं होत असतील तर त्यावर वास्तुशास्त्रामध्ये काय उपाय सांगण्यात आले आहेत, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अनेकदा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे घरात अशी परिस्थिती उद्भवू शकते, जर पती-पत्नीमध्ये सारखी भांडणं होत असतील तर त्याचा परिणाम हा त्या घरातील मुलांवर देखील होतो, तसेच वस्तुशास्त्रानुसार ज्या घरात कायम कलह असतो, अशा घरात कधीही पैसा टिकत नाही. पत्नी -पत्नीचं पटत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.

घरात लावा हे दोन फोटो – वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीचं पटत नेसल, त्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील तर याच्या पाठिमागे त्या घरात निर्माण झालेला वस्तुदोष असू शकतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे बेडरूममध्ये राधा कृष्ण यांचा फोटो लावावा. राधा कृष्ण यांचा फोटो लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी, की बेडरूममध्ये कधीही एकटा कृष्ण किंवा एकट्या राधाचा फोटो लावू नये, तर बेडरूमध्ये राधा कृष्ण दोघांचाही एकत्र फोटो लावावा. तसेच घरात बदकाच्या जोडीचा फोटो लावणं देखील शुभ मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in