• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : देवाचे फोटो या दिशेला चुकूनही लावू नये, घरात नेहमी होतील भांडणं

June 10, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे तुमच्या घरातील ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र असतं. तुमच्या घरात असलेल्या देवघरातून नेहमी सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, या ऊर्जेचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होतो. या ऊर्जेमुळे तुमचं सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होतं, त्यामुळेच तुमच्या देवघरात असलेल्या देवांची नियमित पूजा केली पाहिजे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. परंतु अनेकदा असं देखील होतं की, पूजा करत असताना आपल्या देवघरामधील जे देव आहेत, त्यांची दिशा चुकली की घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक देव हे वास्तुशास्त्रानुसार त्या -त्या ठिकाणीच ठेवले गेले पाहिजे. हा नियम जसा देवघरात ठेवण्यात येणाऱ्या मूर्तींना लागू होतो, तसाच तो नियम तुमच्या घरात असलेल्या देवांच्या फोटोला देखील लागू होतो.

अनेक जण आपल्या घरी वेगवेगळ्या देवांचे फोटो आणतात, आणि ते घरात कोणत्याही भिंतीला दिशेला विचार न करता लावून टाकतात. परंतु यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याऐवजी त्याचा परिणाम उलटा होतो. घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत. देवतांचे फोटो चुकीच्या दिशेला लावले तर त्यामुळे घरात काहीही कारण नसताना वादविवाद वाढतात. पती-पत्नीमध्ये पटत नाही. जर घरात मुलं असतील तर त्यांचा स्वभाव देखील चिडचिडा बनतो. एवढंच नाही तर यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक आर्थिक अडचणी देखील येऊ शकतात. सगळं सुरळीत सुरू असताना व्यापारात अचानक तोटा होतो. आर्थिक अडचणी वाढतात, कर्ज देखील वाढतं. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी देवतांचे फोटो हे योग्य दिशेलाच लावावेत असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

फोटोची योग्य दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात कोणत्या देवतेचा फोटो लावणार आहात? यावरून दिशा ठरते. शक्यतो सर्व फोटो हे पूर्वेकडे तोंड करूनच लावावेत. मात्र जर तुमच्या घरी कुबेराचा फोटो असेल तर तो उत्तर दिशेला भिंतीला लावावा. कारण कुबेर ही धनाची देवता आहे, आणि उत्तर दिशा ही कुबेराला अत्यंत प्रिय असते. त्यामुळे कुबेराचा फोटो हा नेहमी उत्तर दिशेला लावावा. आयुष्यात आर्थिक अडचणी येत नाहीत, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही देवतेचा फोटो हा दक्षिण दिशेला लावू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, वादविवाद वाढतात.याला फक्त अपवाद एकच फोटो आहे, तो म्हणजे भगवान हनुमान यांचा फोटो, हनुमानाचा फोटो हा दक्षिण दिशेला लावला तरी चालतो, त्यामुळे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in