• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : दुसऱ्या घरात शिफ्ट होताना जुन्या घरातील या वस्तू कधीच नेऊ नयेत, वास्तुशास्त्र काय सांगतं?

July 27, 2026 by admin Leave a Comment


अनेकजण नोकरीच्या निमित्ताने किंवा दुसर्‍या काही कामाच्या निमित्ताने आपलं पूर्वीचं राहतं घर बदलतात, ते नव्या घरात शिफ्ट होतात. तसेच जे लोक भाड्याने राहत असतात असे लोक देखील ठरावीक कालावधीने आपलं घर बदलत असतात. वास्तुशास्त्रानुसार अशावेळी आपल्या जुन्या घरातील काही वस्तू या चुकूनही नव्या घरात नेता कामा नये, यामुळे नव्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडू शकतो. अशा वस्तू जुन्या घरातून नव्या घरात नेणे हे वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. त्यामुळे अशा वस्तू एक तर जुन्या घरीच ठेवाव्यात किंवा कुठेतरी दूर टाकून द्याव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात नेमक्या या वस्तू कोणत्या आहेत? आणि या वस्तू जर तुम्ही सोबत आणल्या तर त्याचा काय परिणाम होतो?

झाडू – वास्तुशास्त्रानुसार जुन्या घरातील झाडू कधीही नव्या घरात शिफ्ट होताना सोबत नेऊ नये, कारण यामुळे आर्थिक मार्गात अडथळे निर्माण होतात, एखाद्या महत्त्वाच्या कामाला विलंब लागू शकतो, तसेच इतरही काही अडचणी निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या घरात शिफ्ट होताना कधीही झाडू सोबत घेऊन जाऊ नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

बंद पडलेलं घड्याळ – वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाला वेळ आणि गतीचं प्रतिक माण्यात आलं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचे काटे धावत राहतात, त्याचप्रमाणे तुमचं नशीब देखील धावत राहतं. तुम्हाला प्रगतीच्या नव नवीन संधी उपलब्ध होतात. आर्थिक प्रगती साधली जाते. परंतु जर तुमच्या घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते अशुभ माण्यात येतं. त्याचा नकारात्मक प्रभाव हा तुमच्यावर होत असतो. त्यामुळेच घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये, तसेच जेव्हा तुम्ही दुसरीकडे कुठे तुमचं घर शिफ्ट करणार आहात, तिथे देखील हे असं बंद पडलेलं घड्याळ नेऊ नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

औषधे – वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही नव्या घरात तुमचं सामान शिफ्ट करता तेव्हा कधीही जुन्या घरातून नव्या घरात औषधे नेऊ नयेत, यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. कारण औषधाचा संबंध हा तुमच्या आरोग्याशी असतो.

रद्दी व टाकावू वस्तू – वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही नव्या घरात शिफ्ट होतात, तेव्हा त्या घरात कधीही जुन्या घरातून रद्दी सामान आणि टाकावू वस्तू नेवू नयेत, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in