• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : तुम्हालाही वारंवार वाईट स्वप्न पडतात? मग तुमच्या घरात असू शकतो हा वास्तुदोष

July 3, 2026 by admin Leave a Comment


आपल्या सोबत अनेकदा असं घडतं की आपण एखाद्या नातेवाईकाकडे मुक्कामासाठी गेलो की आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही. कधीकधी वाईट स्वप्न देखील पडतात, त्यामुळे आपण झोपेतून दचकून जागे होतो आणि त्यानंतर आपल्याला रात्रभर झोप लागत नाही. आपल्याला नव्या जागी व्यवस्थित झोप का लागत नाही? नव्या जागी गेल्यानंतर कधी कधी वाईट स्वप्न का पडतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या नव्या किंवा अनोळखी ठिकाणी जाता, तेव्हा तिथली ऊर्जा तुमच्याशी मॅच होण्यासाठी काही काळ लागतो, त्यामुळे तुमच्यासोबत असे प्रकार घडू शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जर एखाद्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असेल तर तिचा देखील परिणाम हा तुमच्यावर होत असतो, ज्या घरात जास्त नकारात्मक ऊर्जा आहे, त्या घरात तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. कधी-कधी आपल्याला आपल्या घरी देखील वाईट स्वप्न पडतात. आज आपण त्यामागेच नेमकी कारणं जाणून घेणार आहोत.

झोपण्याची दिशा – वास्तुशास्त्रानुसार झोपताना तुम्ही नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेकडे तोंड करूनच झोपलं पाहिजे, म्हणजे तुमचं तोडं हे पूर्व किंवा दक्षिण दिशेला हवं तर तुमचे पाय हे पश्चिम किंवा उत्तर दिशेला हवेत. जर तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपलात तर तुमची झोप पूर्ण होणार नाही, तसेच तुम्हाला अशी स्वप्न पडू शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

जर तुम्हाला वारंवार वाईट स्वप्न पडत असतील तर घाबरून जाऊ नका, तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडल्याने कदाचित असं होऊ शकतं. त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे तुम्हाला जर रात्री वाईट स्वप्न पडत असतील तर एक खडे मिठाने भरलेली वाटी तुमच्या बेडजवळ झाकून ठेवा. खडे मीठ हे तुमच्या आसपासची सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात ऊर्जा संतुलन निर्माण होण्यास मदत मिळते, हे खडे मीठ दर आठवड्याला बदलावं, आधीचं खडे मीठ पाण्यात टाकावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

तुमच्या बेडखाली कधीही लोखंडी वस्तू ठेवू नका, जर तुमच्या बेडखाली लोखंडी वस्तू किंवा एखादं जड सामान असेल तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशा स्थितीमुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही. तसेच वाईट स्वप्न देखील पडतात, त्यामुळे बेडखाली कधीही लोखंडी सामान असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in