
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे. ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दल तर माहिती देण्यात आलीच आहे, परंतु आयुष्यात प्रत्येकाला काही न काही संकेत मिळत असतात. जेव्हा असे संकेत एखाद्या व्यक्तीला मिळतात, तेव्हा तो विचार करतो की त्याच्यासोबत ज्या घटना घडत आहेत, त्याचा नक्की अर्थ काय असू शकतो? हे शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत? अशा हजारो प्रश्नांची उत्तर वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी किंवा संकेत असतात, त्या जर आपल्यासोबत वारंवार घडत असतील तर त्यामागे काही तरी विशिष्ट अर्थ दडलेला असतो. त्याचे आपल्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम भविष्यात पहायला मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे जर एखादी घटना तुमच्यासोबत वारंवार घडत असेल तर अशा गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका. काही अशा गोष्टी आहेत, त्या जर तुम्हाला झोपेतून उठल्या -उठल्या वारंवार दिसत असतील तर याचा अर्थ लवकरच तुमचं नशीब बदलणार आहे, असा होतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं? आहे त्याबद्दल.
देवघर – जर तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर लगेचच तुमचं देवघर दिसलं तर हा खूप मोठा शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की भविष्यात तुम्हाला एखादी मोठी संधी मिळणार आहे. कारण तुमचं देवघर हे तुमच्या घरातील सर्वात मोठा पॉझिटिव्ह ऊर्जेचा स्त्रोत असतो. तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करून पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करण्याचं काम तुमचं देवघर करतं. त्यामुळे प्रत्येक घरात देवघर हे असलंच पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
कोकीळा – वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर झोपेतून उठल्यानंतर लगेचच कोकीळा पक्षाचं दर्शन झालं तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे, त्या दिवशी तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. झोपेतून जागं झाल्यानंतर लगेच कोकीळेचं दर्शन होणं हे वास्तुशास्त्रात शुभ माण्यात आलं आहे.
शंख – शंखाशिवाय पूजा पूर्ण होत नाही. देवघरात शंख नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. एवढं शंखाचं महत्त्व आहे. जर तुम्हाला झोपेतून उठल्यानंत शंखाचं दर्शन होत असेल तर समजून ज्या की लवकरच तुमच्या घराला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होणार आहे, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply