• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hanuman Ansh: मुख्य अभिनेता आजारी पडल्याने अचानक मिळाली मोठी संधी; ‘हनुमान अंश’मधल्या शोभिनवचा संघर्ष

September 9, 2026 by admin Leave a Comment


Hanuman Ansh: बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराला मोठी संधी मिळण्यासाठी अनेकदा वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. काही कलाकारांना स्टारडम सहज मिळतं, तर काही जण पडद्यामागे राहून आपल्या कलेवर मेहनत करत असतात. अभिनेता शोभिनव सत्याची कहाणी याच संघर्षाची आणि अनपेक्षित संधीची आहे. FTII मधून अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर तब्बल 10 वर्षे विविध भूमिका आणि पडद्यामागची कामं करत राहिल्यानंतर त्याला ‘हनुमान अंश’मध्ये नीम करोली बाबा यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आज हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करून ब्लॉकबस्टर ठरला आहे.

FTII मधून घेतलं अभिनयाचं प्रशिक्षण

लखनौचा रहिवासी असलेला शोभिनव सत्या याला सुरुवातीपासूनच अभिनय आणि थिएटरची आवड होती. याच आवडीमुळे त्याने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) प्रवेश घेतला. हजारो स्पर्धकांमधून निवड झाल्यानंतर त्याने अभिनयाचं व्यावसायिक शिक्षण घेतलं. मेथड अॅक्टिंग, कॅरेक्टर बिल्डिंग आणि सिनेमाच्या तांत्रिक बाबींचा त्याने सखोल अभ्यास केला.

अभिनयाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शोभिनवने अभिनय शिकवण्याचं कामही केलं. तो ‘ऑप्युलंट स्कूल ऑफ एक्टिंग अँड फिल्म्स’मध्ये अभिनयाचा शिक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र स्वतः अभिनेता म्हणून ओळख निर्माण करण्याचं त्याचं स्वप्न त्याने सोडलं नाही. अभिनयाची संधी मिळण्याची वाट पाहताना शोभिनवने जवळपास 10 वर्षे इंडस्ट्रीत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. तो सहाय्यक दिग्दर्शक, सेकंड युनिट डायरेक्टर आणि स्क्रिप्ट सुपरव्हायझर म्हणून काम करत होता. ‘सीआयडी’, ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ आणि ‘महापौर’ यांसारख्या प्रोजेक्ट्सशीही त्याचा संबंध आला.

विशेष म्हणजे ‘हनुमान अंश’च्या सेटवरही तो अभिनेता म्हणून नव्हे, तर सेकंड असिस्टंट डायरेक्टर म्हणून पोहोचला होता. मात्र नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. चित्रपटातील नीम करोली बाबांची भूमिका साकारणारा कलाकार शूटिंगच्या सुरुवातीलाच आजारी पडला. त्यावेळी दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांच्या नजरेत शोभिनव आला. त्याच्या चेहऱ्याची ठेवण आणि हावभावांमध्ये दिग्दर्शकांना नीम करोली बाबांची झलक दिसली. त्यानंतर त्याची ऑडिशन घेण्यात आली.

चित्रकूटच्या मंदाकिनी नदीवरील घाटावर जवळपास चार तास शोभिनवचं ऑडिशन झालं. FTII मध्ये मिळालेलं प्रशिक्षण आणि अभिनयातील कौशल्याच्या जोरावर शोभिनवने दिग्दर्शकाला प्रभावित केलं आणि त्याची नीम करोली बाबांच्या भूमिकेसाठी निवड झाली. ‘हनुमान अंश’ हा अवघ्या दोन कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. मात्र प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. पाचव्या आठवड्यातही सिनेमाची कमाई सुरू असून त्याची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी आश्चर्यकारक ठरली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? लेस्बियन महिलांना मारहाण; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा…
  • ऑगस्टमध्ये टॉप- 5 चे स्कूटर विक्रीचे आकडे पाहिलेत का ? खरेदी आधी यादी पाहा…
  • Hanuman Ansh: मुख्य अभिनेता आजारी पडल्याने अचानक मिळाली मोठी संधी; ‘हनुमान अंश’मधल्या शोभिनवचा संघर्ष
  • Jemimah Rodrigues Injury : एशियन गेम्सआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, बदली खेळाडूला लॉटरी
  • जेवल्यानंतर लगेच झोपता ? थांबा ! फक्त 10 मिनिटांचा वॉक ठरेल गेमचेंजर, मिळतील मोठे फायदे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in