• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाहीये, व्यवसायामध्ये अडचणी येतायेत? मग करा हे तीन सोपे उपाय

June 7, 2026 by admin Leave a Comment


अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते प्रचंड कष्ट करतात, पैसा कमावतात, परंतु त्याच्या हातात पैसा टिकत नाही. घरी पैसा आला की तो कोणत्या न कोणत्या कारणासाठी लगेच खर्च होतो. तिजोरी नेहमी रिकामी राहते. घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल तर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, जसं की तुमच्या हातात कधीही पैसा टिकत नाही, घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. व्यवसायामध्ये तोटा होतो. एवढंच नाही तर काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये सारखी भाडंण होतात, ही स्थिती कोणत्याही घरासाठी चांगली नसते. त्यामुळे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांमुळे घरात ऊर्जा संतुलन साधलं जातं. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

खर्चावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर – जर तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवता येत नसेल, तुमच्या हातात येणारा पैसा हा अनावश्यक गोष्टींवर खर्च होत असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी तुमचा पगार झाल्यानंतर एक रुपयाचं, पाच रुपयांचं किंवा दहा रुपयांचं नाण लक्ष्मी मातेला आर्पण करा आणि त्यानंतर हे नाणं तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये ठेवून द्या, या उपायामुळे अनावश्यक खर्चावर तर नियंत्रण येईलच सोबतच तुमच्या हातात पैसा देखील टिकून राहील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आचानक धन लाभासाठी – जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अचानक धन लाभाचा योग हवा असेल, किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुमची प्रगती व्हावी तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दर शुक्रवारी दुर्गा मातेला जास्वंदींच्या फुलांची माळा अर्पण करावी, यामुळे दुर्गा मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ‘बॉडी टॅपिंग’ कसे काम करते?
  • कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकत का? मराठमोळ्या वेब सीरिजने वेधलं लक्ष
  • ICC Guidelines: प्रेग्नसीनंतर महिला क्रिकेटपटू संघात पुनरागमन कसं करणार? आयसीसीने दिल्या अशा सूचना
  • सकाळी उठताच करताय ‘या’ 4 चुका, सावध व्हा… वाढतोय ‘हार्ट अटॅक’चा धोका
  • सर्वांना टोमणे मारणारे राज कुमार; पण या अभिनेत्याला एक शब्दही बोलू शकले नाहीत, नाव ऐकून…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in