• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : उंबरठा पूजन का करावं? काय आहेत फायदे? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

June 29, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी याच गोष्टी सांगण्यात आलेल्या नाहीयेत, तर तुमच्या घरात जे वास्तुदोष निर्माण होतात, ते कसे दूर करायचे? त्याचे उपाय देखील सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच एका उपायाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक घरात उंबरठा पूजन केलं जातं. उंबरठा पूजन करणं हे वास्तुशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानलं जातं, परंतु तुम्हाला माहितीये का? उंबरठा पूजन नेमकं कसं आणि का केलं जातं? त्याचे नेमके फायदे काय आहेत? आज आपण या साऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली असेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव हा तुमच्यासह तुमच्या घरातील इतर सदस्यांवर पडतो.  नाकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी उंबरठा पूजन केलं जातं.

अनेकदा आपल्यासोबत अशा घटना घडतात ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. अनेकदा काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. तसेच आर्थिक समस्या निर्माण होतात. तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्या हातात पैसा टिकत नाही. हे सर्व तुमच्या घरात निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो. उंबरठा पूजनामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून तुमचं आणि तुमच्या घराचं संरक्षण होतं.

उंबरठा पूजन कसं करायचं?

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही दररोज सकाळी किंवा सांयकाळच्या वेळी उंबरठा पूजन करू शकता. सर्व प्रथम तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्या, त्यानंतर तो गायीच्या शेणाने सारून घ्या, किंवा ते शक्य नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद टाका, या पाण्याने तुमच्या घराचा उंबरा पुसून घ्या, तसेच दररोज सायंकाळी न चुकता तुमच्या उंबऱ्या शेजारी दिवा लावा. यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in