• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘भारत-चीन दररोज तीनवेळा आमनेसामने, ऑपरेशन सिंदूर असून संपलले नाही…’ काय म्हणाले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी?

June 29, 2026 by admin Leave a Comment


भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. अशातच आता द्विवेदी यांनी शत्रूराष्ट्रांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे. द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतासाठी एक नवा पायंडा निर्माण झाला आहे, जिथे आता दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही. तसेच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांची भीती भारतासाठी आता संपली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही…

जनरल द्विवेदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले आहे की अण्वस्त्रांची धमकी आता दहशतवादासाठी ढाल ठरू शकत नाही. भारताविरोधात आवाज उठवला तर त्याचे उत्तर अचूक, पूर्वनियोजित आणि अत्यंत विनाशकारी असेल. कारण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. भारताची तयारी आणि निर्धार कायम असून पहलगाम हल्ल्याचा बदला ही केवळ सुरुवात होती. आता भारत दहशतवाद्यांना त्यांच्या ठिकाणी घुसून शिक्षा देण्याची क्षमता ठेवतो.’

रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन युद्धासाठी सज्ज

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, ‘भारतीय लष्कर आता केवळ सीमांचे संरक्षण करणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शत्रूला निर्णायक उत्तर देईल. यासाठी रुद्र ब्रिगेड, भैरव बटालियन आणि अश्वनी ड्रोन प्लाटून यांसारख्या अत्याधुनिक आणि घातक युनिट्स तयार करण्यात येत आहेत. “जमिनीवर स्मार्ट बूट, आकाशात गरुडासारखी नजर आणि क्लाऊडमध्ये बुद्धिमत्ता.” हे आमचे ब्रीदवाक्य आहे.

चीन आणि एलएसीबाबतही स्पष्ट भूमिका

चीन सीमेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या स्थिर असली तरी ती संवेदनशील आहे आणि सतत सतर्क राहण्याची गरज आहे. दोन्ही देशांचे सैन्य गैरसमज टाळण्यासाठी आणि सीमावादाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी 1,100 हून अधिक वेळा स्थानिक पातळीवर चर्चा करते. म्हणजेच सरासरी दररोज सुमारे तीन वेळा दोन्ही देशांचे अधिकारी संवाद साधतात. पुढे बोलताना त्यांनी ‘LAC वर भारताची तैनाती अत्यंत मजबूत असून कोणत्याही आव्हानाला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.’ अशी माहिती दिली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, वापरून पहा ‘हे’ किचन हॅक्स
  • Jai Moondra : आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
  • सलमानसोबत ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? 21 वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
  • ‘मी घड्याळ घालत नाही…’, Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण, तुमचेही डोळे खाडकन् उघडतील..
  • बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आता ईशा आऊटरीचकडे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in