• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रावणाची गुहा, अशोक वाटिका.. ‘वाँटेड’ फेम अभिनेत्याने दाखवली श्रीलंकेतील आश्चर्यकारक दृश्ये

June 29, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड चित्रपटांमध्ये खतरनात व्हिलेन साकारणारा अभिनेता प्रदीप काबरा सध्या श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ट्रिपदरम्यान त्याने ‘रामायण’ या पौराणिक कथेशी संबंधित काही ठिकाणांना भेट दिली. रावणाची लंका, सीता मातेला ज्याठिकाणी कैद केलं होतं.. अशा सर्व ठिकाणी पोहोचून त्याने चाहत्यांना तिथले व्हिडीओ दाखवले. लाखो वर्षांनंतर आता रावणाची लंका कशी आहे, तिथली दृश्ये कशी आहेत आणि माता सीतेला कोणत्या दुर्गम ठिकाणी लपवून ठेवलं होतं, हे जेव्हा प्रदीप काबराने नेटकऱ्यांना दाखवलं, तेव्हा सर्वजण थक्क झाले.

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत प्रदीप काबरा म्हणाला, “आजही श्रीलंकेतील प्रत्येक लहान-मोठ्या जागेला रावणाचं नाव दिलं आहे. या जागेचं नाव ‘छोटा रावण धबधबा’ आहे, कारण रावण इथे स्नान करायचा, असं म्हटलं जातं.” हे सांगत असताना प्रदीपने त्या धबधब्याखाली स्नानही केलं. त्यानंतर त्याने रावणाची गुहा दाखवली, जिथे देवी सीतेला सर्वांपासून लपवून कैदेत ठेवण्यात आलं होतं. एला इथं रावणाची ही गुहा आहे. याविषयी प्रदीपने सांगितलं की, “हे इतकं दुर्गम ठिकाण आहे की रावणाने त्यावेळी देवी सीतेला कुठे ठेवलं असेल हे शोधणं खरंच कठीण आहे. मी श्रीलंकेतल्या एका संग्रहालयात गेलो होतो आणि तिथे सापडलेल्या पुराव्यांनुसार रावणाने माता सीतेला आणून एला इथल्या एका गुहेत लपवून ठेवलं होतं. या गुहेचं नाव रावण गुहा असं ठेवण्यात आलं होतं.”

धबधबा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr.loondry (@thepradeepkabra)

रावण गुहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr.loondry (@thepradeepkabra)

अशोक वाटिका-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr.loondry (@thepradeepkabra)

लंका दर्शन-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr.loondry (@thepradeepkabra)

प्रदीप काबराने अशोक वाटिकेचीही एक झलक दाखवली. हे ठिकाण इतकं सुंदर आहे की याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही, असं तो म्हणाला. यावेळी प्रदीपने ते झाडही दाखवलं जिथे माता सीता बसत असत आणि जिथे भगवान हनुमानाने त्यांचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर त्याने रावणाची लंका दाखवली. वाल्मिकी रामायणानुसार, रावणाची लंका त्रिकुटा पर्वतरांगेत वसलेली होती. पण आता फक्त त्याचे अवशेषच शिल्लक आहेत. एका व्हिडीओमध्ये प्रदीपने महालातील ती जागा दाखवली जिथे रावणाचं सिंहासन होतं आणि जिथे तो बसायचा.

प्रदीप काबराने सलमान खानच्या ‘वाँटेड’पासून ते ‘बँग बँग’, ‘दिलवाले’, ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘सीआयडी’, ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’सारख्या टीव्ही मालिकांमध्येही त्याने काम केलंय.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in