• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती

August 26, 2026 by admin Leave a Comment


गुजरातच्या सूरतमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईहून अहमदाबादला निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर सूरतमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. ज्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली, त्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये त्यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल या देखील प्रवास करत होत्या. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर रेल्वेकडून याची माहिती तातडीने जीआरपीला देण्यात आली. ज्या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली, त्या ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यादेखील होत्या, अशी माहितीही रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान सुदैवान या घटनेत आनंदीबेन पटेल यांना कोणतीही इजा झालेली नाहीये, या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा हल्ला सूरतच्या उतरान रेल्वे स्टेशनच्या जवळ झाला आहे. यावेळी आनंदीबेन पटेल या आपल्या कुटुंबासोबत अहमदाबादला निघाल्या होत्या. पोलिसांनी ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या तरुणाला अटक केलं असून, समोर आलेल्या माहितीनुसार हा तरुण मानसिकदृष्या अस्थिर आहे.

ट्रेनची खिडकी फुटली

दरम्यान या घटनेत ट्रेनचं नुकसान झालं आहे, वंदे भारत एक्स्प्रेसची काच तुटली आहे. मात्र सुदैवाने या घटनेत आनंदीबेन पटेल यांना कोणतीही इजा झालेली नाहीये, ही घटना घडली तेव्हा आनंदीबेन यांच्यासोबत त्यांची मुलगी अनार पटेल या देखील प्रवास करत होत्या. आनंदीबेन पटेल या पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र या घटनेत ट्रेनचं नुकसान झालं आहे, ट्रेनच्या खिडकीची काच फुटली आहे. या घटनेबाबत माहिती देताना पश्चिम रेल्वेच्या बडोदरा डिव्हिजनचे पीआरओ अभिनव सक्सेना यांनी माहिती दिली की, ही ट्रेन मुंबईवरून अहमदाबादला जात असताना ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे, दरम्यान आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्याने दगडफेक का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या काही दिवसांची सुट्टी घेऊन गुजरात दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्यासोबत दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल पटेले हे देखील प्रवास करत होते. तसेच त्यांची मुलगी अनार पटेल देखील प्रवास करत होत्या. याचदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in