• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi : New Chapter , दोनच शब्द.. वैभव सूर्यवंशीच्या नव्या पोस्टने खळबळ; काय घडतंय?

July 4, 2026 by admin Leave a Comment


अवघ्या 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने भल्याभल्यांना धडकी भरवली आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाही तर आग ओकते. त्यात गोलंदाज होरपळून निघून जात आहे. त्यामुळेच आता वैभवला टीम इंडियात कधी संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येकाचं लक्ष या एकाच निर्णयाकडे लागलं आहे. आज इंग्लंड विरोधात मँचेस्टरमध्ये दुसरा टी-20 सामना आहे. पण या सामन्यापेक्षा वैभवचीच अधिक चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच वैभवने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामुळे त्याच्याबाबतचं सस्पेन्स वाढलं आहे.

शुक्रवारी रात्री वैभवने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो बॅट उंचावून जल्लोष करताना दिसत आहे. त्यावर केवळ दोनच शब्द लिहिले आहेत. New Chapter हे दोनच शब्द त्याने पोस्टमध्ये लिहिले आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. नवीन अध्याय, याचा अर्थ काय? वैभवला टीम इंडियात संधी मिळणं फिक्स झालंय? की वैभवला अजून काही सूचवायचं आहे? अशी चर्चा आता त्याचे चाहते करू लागले आहेत.

एक पीसी, हजार चर्चा

दरम्यान, शुक्रवारी मँचेस्टरमध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये टीम इंडियाचे कोच मोर्ने मॉर्कल यांनी एक विधान केलं. या विधानामुळे वैभवच्या टी-20मधील डेब्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माला टीममधून लगेच काढलं जाणरा नाही. टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी खेळाडूंवर भरोसा ठेवणं आवश्यक आहे, असं मॉर्कल म्हणाला. त्याच्या या विधानानंतर टी-20मध्ये पदार्पण करण्यासाठीही वैभवला थांबावं लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सांगूनच टाकलं

पण मॉर्केलचं हे विधान आल्यानंतर वैभव सूर्यवंशीने नवा अध्याय म्हणून पोस्ट केल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. वैभवला नक्की काय सूचवायचं आहे? त्याला काय सांगायचं आहे? याचा प्रत्येकजण आपआपल्या परिने कयास लावत आहे. वैभवनेही अशा प्रकारची पोस्ट करून सर्वांनाच डोकं खाजवायला लावलं आहे.

पदार्पणाचे संकेत

सोशलम मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. काहींचं म्हणणं आहे. वैभव टीम इंडियात येणार आहे. त्याचे हे संकेत आहेत. काहीचं म्हणणं आहे, जोपर्यंत काहीच माहिती समोर येत नाही, तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढायला नको. काही असो, पण वैभवबाबत अजून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

ही जाहिरात तर नाही?

दरम्यान, काही दिवसांपासून वैभवच्या बॅट स्पॉन्सरचीही चर्चा सुरू आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोत बॅट उंचावलेली दिसत आहे. त्यावर हिरोचं स्टिकर लावलेलं आहे. तो एसएस ब्रँडच्या बॅटचा वापर करतो. त्यामुळे नवा अध्याय हा एखाद्या नवीन बॅटच्या कराराचा संकेत तर नाही ना? अशी चर्चाही आता रंगली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘कसोटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकियाच्या मुलाच्या गाडीवर कोसळलं झाडं; गाडीचा चक्काचूर, त्याची प्रकृती…
  • पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233…
  • लग्नाशिवाय प्रेग्नेंट राहिलेली 67 वर्षांची ही अभिनेत्री, भीतीने उचलणार होती मोठं पाऊल, पण तिने….
  • India-Bhutan : जवळचा मित्र असूनही पेट्रोलच्या बाबतीत भूतानने भारताला दिला मोठा धक्का, विश्वास ठेवायला तयार नाही
  • राम मंदिरातील दानावर डल्ला… सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया… दोन शब्दात बोलले काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in