• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंका दौऱ्यात वैभव सूर्यवंशी फेल असला तरी एकाबाबतीत सरस, म्हणून टीम इंडियात तो हवाच

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारतीय अ संघाच्या श्रीलंका दौऱ्याची सर्वाधिक चर्चा आहे ते वैभव सूर्यवंशीमुळे.श्रीलंकेतील वैभवच्या प्रदर्शनावर क्रिकेटच्या जाणकारांचं बारीक लक्ष आहे. अजून वैभवला या दौऱ्यात आपली छाप उमटवता आलेली नाही हे सत्य आहे. पण दुसऱ्या सुद्धा काही त्याच्या जमेच्या बाजू आहेत, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीची भारतीय अ संघात आणि सिनियर टीम इंडियात निवड झाली आहे. इंग्लंड आणि आर्यलंड दौऱ्यात सिनियर टीम इंडिया T20 मालिका खेळणार आहे. वैभव सूर्यवंशीला या दौऱ्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. पण त्यासाठी त्याने इंडिया ए कडून जबरदस्त खेळ दाखवणं आवश्यक आहे. श्रीलंकेत वैभवला अजून हे जमलेलं नाही. पण उद्या रविवारी फायनल आहे. त्यामुळे त्याच्याकडे छाप पाडण्याची ही शेवटची संधी असेल.

श्रीलंका दौऱ्यात तिरंगी मालिकेतील चार सामन्यात वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत 14,44,21 आणि 38 धावा केल्या आहेत. वैभव अजूनपर्यंत मोठी इनिंग खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. फायनलमध्ये वैभवने खणखणीत खेळी केली, तर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल. महत्वाच्या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये वैभवने आतापर्यंत नेहमीच दमदार खेळ दाखवला आहे. रविवारी सुद्धा त्याच्याकडून हीच अपेक्षा असेल. श्रीलंका दौऱ्यात वैभव आतापर्यंत तीनवेळा 20 धावांच्या पुढे गेला आहे. पण त्याने अजूनपर्यंत एकही अर्धशतक झळकवलेलं नाही. ओपनिंग करताना इंडिया A ला त्याने दमदार सुरुवात करुन दिली आहे. पण मधल्या ओव्हर्सपर्यंत थांबून मोठी इनिंग खेळू शकलेला नाही.

वैभवसाठी जमेची बाजू काय?

सध्याचं त्याचं प्रदर्शन पाहता, आंतरराष्ट्रीय स्तराचं क्रिकेट वेगळं असतं, वैभव अजून त्यासाठी तयार नाही, असं त्याच्या बाबतीत विश्लेषण करतील. पण असं म्हणणं खूपच कठोर होईल. भले तो अजून मोठी खेळी करु शकलेला नसेल, पण श्रीलंका दौऱ्यात वैभव सूर्यवंशी बद्दल एक चांगली बाब ही आहे की, तो झटपट धावा बनवतोय. टीमला चांगली स्टार्ट देतोय. अफगाणिस्तान अ विरुद्ध त्याने 22 चेंडूत 44 धावा फटकावल्या. त्यानंतर पुन्हा अफगाणिस्तान विरुद्धच 28 चेंडूत 38 धावा केल्या. या धावा बनवताना त्याने त्याच्या शैली प्रमाणे गोलंदाजांवर हल्ला चढवला.

वैभवला बांधून ठेवता येणार नाही हे या आकड्यातून दिसतं

स्ट्राइक रेट यामध्ये महत्वाचा ठरतो. चार सामन्यात वैभवने आतापर्यंत 117 धावा केल्या आहेत. या धावा बनवताना त्याचा स्ट्राइक रेट 150 च्या पुढे आहे. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये हा स्ट्राइक रेट महत्वाचा ठरतो. वैभवला बांधून ठेवता येणार नाही हे या आकड्यातून दिसतं. तो अजूनही बॉलरचा त्याची दिशा आणि टप्पा बदलायला भाग पाडतो. वैभवच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
  • Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज
  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in