• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, 0 वर बाद होताच धडकली आनंदवार्ता!

April 14, 2026 by admin Leave a Comment


Vaibhav Sooryavanshi Team India Selection: भारताचा स्फोटक तरूण फलंदाज वैभव सूर्यवंशीला याला टीम इंडियाची लॉटरी लागली आहे. सरराईजर्स हैदराबादविरोधातील सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. चाहते निराश झाले. पण आता त्याचासाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा पुढील T20 मालिकेचा भाग असू शकतो.सूर्यवंशीची निवड जूनमध्ये आयर्लंडविरोधात होणार्‍या T20 मालिकेसाठी होऊ शकते असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

आयर्लंडविरोधात T20 मालिकेत वैभव सूर्यवंशी?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातील दाव्यानुसार, वैभव सूर्यवंशी आगामी इंग्लंडविरोधातील व्हाईट बॉल मालिकेपूर्वी BCCI त्याला एक मोठा ब्रेक देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते आयर्लंडविरोधातील मालिकेत खेळेल असा दावा करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीआधारे हे वृत्त देण्यात आले आहे. त्यात वैभव सूर्यवंशीचे नाव सुद्धा दुसर्‍या खेळाडूसह यादीत घेतल्याचे म्हटले आहे.

सर्वात तरूण क्रिकेटपटू

वैभव सूर्यवंशी टीम इंडियात निवड होणारा सर्वात तरूण क्रिकेटर असेल. जर त्याला आयर्लंडविरोधातील T20 मालिकेत संधी मिळाली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटर असेल. यापूर्वी काही जणांना पदार्पणातच जागतिक क्रिकेट मैदानावर खेळण्याची संधी मिळाली असली तरी वैभव हा कमी वयाचा खेळाडू आहे.

वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार?

वैभव सूर्यंवंशीला ही संधी का दिल्या जाऊ शकते, असे अनेकांना वाटत आहे. तर त्याच्यामागे, त्याची स्फोटक खेळी आहे. सलामीलाच इतका स्फोटक फलंदाज उतरवल्यानंतर विरोधी संघावर मनोबल वाढवणे आणि मानसिक दबाव वाढण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तो गेल्या एका वर्षापासून लाईमलाईटमध्ये आहे. सोबतच त्याची दमदार खेळी ही त्याची सर्वात मोठी उजवी बाजू आहे. IPL 2026 मध्ये दिग्गज गोलंदाजांची त्याने धुलाई केली आहे. IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत तो सर्वात पुढे आहे.

नियम काय सांगतो?

वैभव सूर्यवंशी हा राष्ट्रीय क्रिकेट संघात असावा अशी अनेकांची आग्रही मागणी आहे. आयपीएलमध्ये त्याने डोळ्याचे पारणे फेडणारी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी कमीत कमी 15 वर्षांचा खेळाडू हवा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा ऐन उमेदीच्या काळात पाकिस्तानविरोधात दमदार खेळी खेळली होती. आता वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे त्याला कारकि‍र्दीत अनेक विश्व विक्रम नोंदवण्याची संधी मिळेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अल्पावधीत मोठा नफा म्हणत जयवंत वाडकरांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट; अखेर नको तेच घडलं..
  • एक असा अभिनेता ज्याला खायचे होते गर्लफ्रेंडचे मांस, कारण ऐकून अंगावर काटा, वादामुळे करिअर झालं बर्बाद
  • मोठी बातमी! एसीचा मोठा स्फोट, धक्कादायक घटना, तब्बल 9 जणांचा मृत्यू तर..
  • जगाला ज्याची भीती तीच धक्कादायक धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून, जगात हाहाकार, कोणत्याही..
  • काका सलमानप्रमाणेच पुतण्याचा निर्णय; आईवडिलांच्या घटस्फोटाचा मुलगा अरहानवर परिणाम?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in