• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काका सलमानप्रमाणेच पुतण्याचा निर्णय; आईवडिलांच्या घटस्फोटाचा मुलगा अरहानवर परिणाम?

May 3, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकदा चाहत्यांकडून विचारला जातो. सलमान आता 60 वर्षांचा असून त्याचा पुतणासुद्धा त्याच्याच पावलांवर पाऊल टाकणार असल्याचं दिसतंय. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहाननेही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरहानचा जन्म 2002 मध्ये झाला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तो सहसा आईकडेच राहतो. परंतु वडील अरबाज आणि सावत्र आई शुरा खान यांच्यासोबतही त्याचं चांगलं नातं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका तिच्या मुलाच्या या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

‘टाइम्स एंटरटेन्मेंट’ला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, “अरहानने मला स्पष्टच सांगितलं की मी लग्न करणार नाही. त्यामुळे कृपया नातवंडांचा विचार सोडून द्या. जेव्हा मी त्याला विचारलं की, असं का? त्यावर त्याने मला सांगितलं की, मी या जगात माझ्या मुलांना का आणू, जेव्हा AQI 500 आणि 1000 च्या आसपास पोहोचलेलं असेल? मी माझ्या मुलांसोबत असं का करेन? तेव्हा मी त्याला म्हणाली, तू वेडा आहेस का, तू या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायला हवा. नंतर मीच विचार केला की, जसं त्याला योग्य वाटेल तसं करू दे. फक्त त्याने खुश राहावं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arhaan Khan (@iamarhaankhan)

भारतातील अनेक राज्यांमध्ये वायू प्रदूषण वाढलं असून मुंबईतील हवेची गुणवत्तासुद्धा खालावलेली आहे. भविष्यात ही गुणवत्ता आणखी खाणावली तर अशा वातावरणात आपल्या मुलांना का वाढवायचं, असा सवाल अरहानने आईला केला. मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं. अरहानने अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलंय. अरबाजच्या कुटुंबीयांकडूनही अरहानचे खूप लाड होतात. मुलाखातर ते आजही माझी काळजी करतात, असं खुद्द मलायकाने तिच्या शोमध्ये म्हटलं होतं.

मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरहानचे वडील अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच शुराने बाळाला जन्म दिला. शुराचं अरहानसोबतही मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळतंय. शुरा आणि अरहानला एकत्र वेळ घालवतानाही पाहिलं गेलंय.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?
  • शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना…
  • Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती
  • Sanjay Raut | सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  • भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा इशारा, थेट निर्बंधच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in