• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक असा अभिनेता ज्याला खायचे होते गर्लफ्रेंडचे मांस, कारण ऐकून अंगावर काटा, वादामुळे करिअर झालं बर्बाद

May 3, 2026 by admin Leave a Comment


हॉलिवूड अभिनेता आर्मी हॅमर जेव्हा इंडस्ट्रीत दाखल झाला तेव्हा त्याला मोठा स्टार होण्याची क्षमता असलेला अभिनेता मानलं जात होतं. ‘द सोशल नेटवर्क’ या चित्रपटात त्याने डबल रोल साकारत प्रेक्षकांना चकित केलं. त्यानंतर ‘द लोन रेंजर’ आणि कॉल मी बाय युवर नेम यांसारख्या चित्रपटांनी त्याला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या व्यक्तिमत्त्वावरही चाहत्यांची भुरळ पडली होती.

जानेवारी 2021 मध्ये मात्र त्याच्या आयुष्यात मोठा वाद उभा राहिला. सोशल मीडियावर त्याचे काही कथित खाजगी चॅट्स लीक झाले. ज्यामुळे संपूर्ण हॉलिवूड हादरलं. या चॅट्समध्ये त्याने लिहिलेल्या काही गोष्टी अत्यंत विचित्र आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं गेलं.

‘कॅनिबाल’ फॅन्टसीचे आरोप

या प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक आरोप म्हणजे त्याला ‘मानवी मांस खाण्याची फॅन्टसी’ असल्याचा. लीक झालेल्या संदेशांमध्ये त्याने कथितरित्या आपल्या गर्लफ्रेंडला ‘तुला खाऊ इच्छितो’ असे म्हटल्याचा दावा करण्यात आला. या दाव्यांमुळे प्रेक्षक आणि इंडस्ट्री दोन्ही ठिकाणी खळबळ उडाली.

वाद वाढत असताना त्याच्या काही माजी गर्लफ्रेंड्स समोर आल्या. त्यांनी त्याच्यावर हिंसक वागणूक आणि मानसिक छळाचे आरोप केले. काही महिलांनी त्याच्यावर शारीरिक दुखापत करण्याचे आणि जबरदस्तीचे आरोपही लावले. या आरोपांनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, आर्मी हॅमरने सुरुवातीपासूनच हे सर्व आरोप फेटाळले आणि स्वतःवरचे गंभीर आरोप नाकारले.

करिअरवर मोठा परिणाम

या वादांचा थेट परिणाम त्याच्या करिअरवर झाला. ‘शॉटगन वेडिंग’ या चित्रपटातून त्याला बाहेर काढण्यात आलं तसेच The Offer या वेब सीरिजमधूनही त्याची हकालपट्टी झाली. याशिवाय त्याची टॅलेंट एजन्सी आणि पब्लिसिस्ट यांनीही त्याच्याशी संबंध तोडले. अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली.

काही काळानंतर आर्मी हॅमरने या सर्व प्रकरणांवर प्रतिक्रिया दिली. त्याने मान्य केलं की त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्या होत्या आणि काही नात्यांमध्ये तो ‘इमोशनल अब्यूज’ करणारा होता. मात्र, त्याने बलात्कार किंवा ‘कॅनिबाल’ असल्याचे आरोप पूर्णपणे नाकारले. त्याच्या मते, त्या गोष्टी ‘डार्क फॅन्टसी’ किंवा चुकीच्या पद्धतीने केलेला विनोद होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?
  • शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना…
  • Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती
  • Sanjay Raut | सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  • भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा इशारा, थेट निर्बंधच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in