• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi : वैभव आज चांगला खेळला, पण मागच्या दोन सामन्यात त्याला एक गोष्ट जमलेली नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो

June 11, 2026 by admin Leave a Comment

आक्रमक फलंदाजी एवढीच वैभव सूर्यवंशीची ओळख नाहीय. तो सिक्सर किंग सुद्धा आहे. अनेक फलंदाज डावातल्या पहिल्या चेंडूला मान देतात. पण वैभव सूर्यवंशी अपवाद आहे. तो पहिल्या चेंडूवर सुद्धा सिक्स मारतो. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून जितके चौकार पाहिले, तितकेच षटकारही अनुभवता आले. बेधडक फलंदाजी करताना गोलंदाजांनी टाकलेले चेंडू डायरेक्ट प्रेक्षक स्टँडमध्ये पोहोचवणं ही वैभव सूर्यवंशीची आणखी एक ओळख आहे. पण श्रीलंका दौऱ्यावर वैभव सूर्यवंशीला प्रतिक्षा करावी लागतेय. वैभव सूर्यवंशी कुठल्याही सामन्यात सिक्सर मारल्याशिवाय राहू शकत नाही. पण श्रीलंकेच्या भूमीवर त्याला पहिल्या षटकारासाठी वाट पहावी लागत आहे.

श्रीलंकेत वनडे तिरंगी मालिका सुरु आहे. तिन्ही देशांच्या A टीम या टुर्नामेंटमध्ये खेळत आहेत. पहिल्या दोन सामन्यात वैभव सूर्यवंशी आतापर्यंत 34 चेंडू खेळला. पण अजूनपर्यंत त्याला षटकार ठोकता आलेला नाही. त्याच्या बॅटमधून धडाधड चौकार निघतायत. दोन सामन्यात 34 चेंडूत आतापर्यंत त्याने 12 चौकार वसूल केलेत. वैभवने दोन सामन्यात आतापर्यंत 58 धावा केल्या आहेत. यात फक्त बाऊंड्री मारुन 48 धावा केल्या आहेत. 10 धावा फक्त पळून काढल्या आहेत.

200 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी

भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान असे तीन देशांचे संघ या टुर्नामेंटमध्ये आहेत. अफगाणिस्तान ए विरुद्ध वैभव सूर्यवंशीच लिस्ट ए करियरमधील दुसरं अर्धशतक हुकलं. त्याचा हा 10 वा लिस्ट ए सामना होता. वैभव सूर्यवंशीने अफगाणिस्तान विरुद्ध 22 चेंडूत 200 च्या स्ट्राइक रेटने 44 धावा फटकावल्या. यात 9 चौकार लगावले. याआधी श्रीलंका ए विरुद्ध वैभवने 12 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशी लांब लचक षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. पण श्रीलंकेच्या भूमिवर मात्र त्याला सिक्स मारणं अजून जमलेलं नाही.

वैभव सूर्यवंशीच्या लिस्ट ए करियरमध्ये किती धावा?

वैभव सूर्यवंशीने लिस्ट ए करियरमध्ये आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकासह 411 धावा केल्या आहेत. त्याने या दरम्यान 49 चौकार आणि 23 सिक्स मारल्या आहेत. यात एकही सिक्स श्रीलंकेत मारलेला नाही. निदान पुढच्या सामन्यात तरी वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून सिक्सर निघूं दे अशी तमाम चाहत्यांची इच्छा आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in