• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Udhayanidhi Stalin : आधी वाटलं स्टालिन पाण्याच्या कनेक्शन बद्दल बोलतायत पण नंतर..त्रिशा बद्दलच्या अश्लील कमेंटवरुन अभिनेत्रींचा संताप

August 5, 2026 by admin Leave a Comment


तामिळनाडूच्या राजकारणात मोठा वाद सुरु झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावरुन या सर्व वादाची सुरुवात झाली आहे. दक्षिणेतील अभिनेत्रींनी सुद्धा यावर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्टालिन यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्रिशाला पाठिंबा दिला आहे. गायिका चिन्मयी श्रीपदा आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी स्टालिनचा चांगलाच समाचार घेतला. “राजकीय लढाईत महिलांना ओढणं योग्य नाही. राजकारणाशी देणं-घेणं नसलेल्या महिलांना लक्ष्य करण्याऐवजी नेत्यांनी जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे” असं चिन्मयीने आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. “मला सुरुवातीला स्टालिनची कमेंट समजली नाही. नंतर मला त्यातला डबल मिनिंग अर्थ लक्षात आला” असं चिन्मयीने लिहिलय.

“मला आधी वाटलं की, स्टालिन पाण्याच्या कनेक्शन बद्दल बोलत आहेत. पण नंतर त्याचा संदर्भ माझ्या लक्षात आला. बहुतेक महिलांना सुरुवातीला ती कमेंट समजली नाही. खरंतर उदयनिधीने जमावाला शांत केलं पाहिजे होतं. पण त्याने असं केलं नाही. उलट तोच जास्त आक्षेपार्ह बोलला. नव्या पिढीकडून अशा भाषेची अपेक्षा नव्हती” असं चिन्मयी श्रीपदाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलय.

If men in politics could just focus on actual issues instead of dragging women who have nothing to do with their scheme of things – it would be stellar.

The reason abusive motor mouths like DMKs Shivaji Krishnamurthy could speak so vulgarly on political platforms is because he…

— Chinmayi Sripaada (@Chinmayi) August 4, 2026

..तर कुटुंबातील महिला सुरक्षित राहणार नाहीत

भाजप नेता आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सुद्धा उदयनिधीच्या वक्तव्याचा निषेध केला. उदयनिधीची टिप्पणी खूप घाणेरडी आणि अपमानस्पद असल्याच त्या म्हणाल्या. “अशा प्रकारच्या भाषेला सामान्य मानलं गेलं तर आमच्या कुटुंबातील महिला सुरक्षित राहणार नाहीत. सार्वजनिक जीवनात भाषेची मर्यादा असली पाहिजे. प्रत्येक महिलेचा सन्मान केला पाहिजे. राजकारणात स्त्रीला मोहरा बनवून टिप्पणी करु नये. खरंतर स्टालिनने आपल्या कमेंटसाठी त्रिशाची माफी मागितली पाहिजे” असं खुशबू म्हणाल्या.

Heard #Udhayanidhi Stalin’s speech. It was crass, cheap and deeply derogatory; reflecting the very political culture he seems eager to inherit.

If those with such a mindset aspire to lead a political party and one day govern the state, then God help us. What else can one expect…

— KhushbuSundar (@khushsundar) August 4, 2026

तृषाचं नाव ऐकून स्टालिन आधी हसले मग..

कावेरी नदी वादात स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय यांना घेरलं. त्याचवेळी जमलेल्या गर्दीतून “तृषा, तृषा”च्या घोषणा सुरु झाल्या. तृषाचं नाव ऐकून स्टालिन आधी हसले मग अश्लील टिप्पणी केली नंतर स्पष्टीकरण दिलं.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in